Casting Couch | ‘त्यानंतर तीन दिवस मला ताप…’, ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' फेम अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाने केली धक्कादायक मागणी; आलेला अनुभव सांगत म्हणाली, 'तीन दिवस मला ताप...'

Casting Couch | 'त्यानंतर तीन दिवस मला ताप...', 'ये रिश्ता क्या कहलाता हैं'  फेम अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 8:52 AM

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काउचवर हैराण करणारे अनुभव शेअर केले आहेत. ज्यामुळे प्रत्येक अभिनेत्रीला या वाईट प्रवृत्तीचा सामना करावा लागतो.. असं देखील समोर आलं आहे. प्रसिद्धी, पैसा, संपत्ती.. यांसारख्या अनेक गोष्टींमुळे झगमगत्या विश्वाचं आकर्षण कित्येकांना असतं.. अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी मायानगरीत येत असतात.. पण नव्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागतो. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेपासून ‘देवों के देव महादेव’ मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री चारु असोपा हिने इंडस्ट्रीचं काळं सत्य उघड केलं आहे. करियरमध्ये कास्टिंग काउचचा सामना केला आहे. त्या दिवसानंतर मला तीन दिवस ताप आला होता. मी जागेवरुन उठू देखील शकत नव्हती असा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला आहे.

अभिनेत्री व्हायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चारु तिच्या कुटुंबासोबत मुंबईत आली होती. काही दिवस भाड्याने घर घेतल्यानंतर चारुचे वडील आणि भाऊ पुन्हा त्यांच्या घरी गेली आणि चारु हिची आई लेकीसाठी मुंबईत राहिली. सुरुवातील चारु हिला काहीही कळत नव्हतं. त्यानंतर अभिनेत्रीला हळू – हळू सर्व कळू लागलं…

इंडस्ट्रीबद्दल चारु हिच्या आईच्या मनात भीती होती. कारण त्यांनी इंडस्ट्रीबद्दल अनेक चांगल्या-वाईट गोष्टी ऐकल्या होत्या. करियरच्या सुरुवातीला चारु हिने किशोर नमित कपूर स्कूलमध्ये प्रवेश घेतला. ज्यामुळे चारु हिला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या ऑडिशनबद्दल कळलं. मालिकेत चारु हिने सात – आठ महिने पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली.. याच दरम्यान तिला ‘महादेव’ मालिकेत भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

मालिकांमध्ये संधी मिळत असताना चारू हिच्यासमोर कास्टिंग काउच सारख्या धक्कादायक प्रसंगाचा सामना करावा लागला. अभिनेत्री म्हणाली, ‘मी ज्या प्रॉडक्शन हाऊसबद्दल बोलत आहे, ते प्रचंड प्रसिद्ध आहे. कास्टिंग दिग्दर्शकाने माझ्यासमोर एक करार ठेवला. मी त्यावर सही करणार तेव्हा त्याने माझ्याजवळ एक अट ठेवली..’

पुढे अभिनेत्री म्हणाले, ‘तेव्हा तो जे काही म्हणाला त्यामुळे मला तीन दिवस ताप होता. मी त्याला स्पष्ट नकार दिला. तेव्हा तो म्हणाला, तू करणार नासशील तर असं करणाऱ्या मुलींची बाहेर रांग लागली आहे… मी त्याला ठिके आहे असं म्हणून बाहेर निघाली…’ सध्या सर्वत्र चारू आणि तिल्या आलेल्या कास्टिंग काउचच्या अनुभवाची चर्चा रंगत आहे.

चारु हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. एवढंच नाही तर, बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन याच्यासोबत चारु हिचं लग्न झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. मुलगी झाल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला..

'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.