Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’ व्हायरल केल्याप्रकरणी आणखी एकाला अटक; नेमकं काय आहे प्रकरण?

गेल्या काही वर्षांत चित्रपटांची पायरसी ही एक मोठी समस्या बनली आहे. नवीन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होताच ते विविध बेकायदेशीर लिंक्सद्वारे लीक केले जातात. याचा फटका चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठ्या प्रमाणावर बसतो. असाच फटका 'छावा' या चित्रपटालाही बसला आहे.

'छावा' व्हायरल केल्याप्रकरणी आणखी एकाला अटक; नेमकं काय आहे प्रकरण?
Vicky Kaushal in ChhaavaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 13, 2025 | 9:20 AM

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाचं बेकायदेशीर प्रक्षेपणप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. नाशिकमधून 26 वर्षीय विवेक धुमाळ नावाच्या मुलाला पोलिसांनी अटक केली. moviesprime.xyz ही वेबसाइट ऑपरेट केल्याचा विवेकवर आरोप आहे. याच वेबसाइटवरून ‘छावा’ आणि इतर चित्रपटांचं बेकायदेशीर प्रेक्षपण केलं जात होतं. साऊथ सायबर पोलीस स्टेशनचे पीएसआय दीपक देसले आणि कॉन्स्टेबल लहारे यांनी शुक्रवारी विवेकला अटक केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी देशभरात प्रदर्शित झाला होता. 2025 मधील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. परंतु इंटरनेटवर हा चित्रपट मोठ्या प्रमाणात लीक झाल्याने त्याचा फटकाही निर्मात्यांना बसला आहे.

‘छावा’ या चित्रपटाच्या 1818 बेकायदा इंटरनेट लिंक सापडल्या होत्या. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सागर रांधवन या 26 वर्षीय तरुणाला पुण्यातील दौंड इथून अटक केली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या लिंक बेकायदेशीररीत्या इंटरनेटवर अपलोड करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. आतापर्यंतच्या तपासणीत 1818 बेकायदा लिंक इंटरनेटवर आढळल्या आहेत. त्याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदारांनी तक्रार दिलेल्या 1818 बनावट लिंकपैकी एक लिंक तांत्रिक तपासात आरोपी सागर रांधवन याने प्रसारित केल्याचं निष्पन्न झालं. आरोपीने चित्रपटाच्या होस्टिंगरकडून डोमेन खरेदी केल्याचं तपासात निष्पन्न झालं. तसंच त्याने एख ॲप तयार केलं होतं. तिथे पैसै भरून ॲप डाऊनलोड करणाऱ्यांना ‘छावा’ आणि इतर नवीन प्रदर्शित होणारे चित्रपट पाहता येत होते. याप्रकरणी सागरला न्यायालयात हजर केलं असता 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा

नुकताच हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे दोन तास 37 मिनिटांचा हा चित्रपट आता तुम्ही मोबाइलवर किंवा घरबसल्या पाहू शकता. ‘छावा’ने जगभरात तब्बल 790.14 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर भारतातील कमाईचा आकडा 600 कोटी रुपयांहून अधिक आहे. यामुळे 2025 या वर्षातील हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पोहोचला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम.
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ.
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना.
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी.
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?.
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.