Video: वीर मराठा शोले… ‘RRR’च्या गाण्यात साऊथ सुपरस्टार्सकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट RRR येत्या 25 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. राजामौली यांनी यावेळी केवळ चित्रपटाच्या तांत्रिक बाबींवरच नाही तर दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या मार्फत भारताचा प्रेरणादायी इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Video: वीर मराठा शोले... 'RRR'च्या गाण्यात साऊथ सुपरस्टार्सकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना
RRRImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 5:28 PM

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट RRR येत्या 25 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. राजामौली यांनी यावेळी केवळ चित्रपटाच्या तांत्रिक बाबींवरच नाही तर दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या मार्फत भारताचा प्रेरणादायी इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रामचरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) यांच्यासोबतच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात रामचरणने स्वातंत्र्यसैनिक ‘अल्लुरी सीताराम राजू’ची भूमिका साकारली आहे. तर, ज्युनियर एनटीआर ‘कोमाराम भीम’च्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘शोले’ हे गाणं प्रदर्शित झालं असून या गाण्यात या तिन्ही कलाकारांनी देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांना मानवंदना दिली आहे. ‘वीर मराठा शोले’ असं म्हणत रामचरण आणि ज्युनियर एनटीआरने छत्रपती शिवाजी महाराजांचाही जयजयकार केला आहे.

‘आरआरआर सेलिब्रेशन अँथम’ असं नाव या गाण्याला दिलं आहे. राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि रामचरण ही तिन्ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील खूप मोठी नावं आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला 24 तासांच्या आत युट्यूबवर 30 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात जेव्हा ज्युनियर एनटीआर आणि रामचरण हे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर वंदन करतात, तेव्हा अंगावर काटा आल्याची भावना नेटकऱ्यांनी व्हिडीओच्या कमेंट्समध्ये व्यक्त केली आहे. ‘यालाच मास्टरपीस म्हणतात’, असंही एकाने म्हटलंय.

दिग्दर्शक राजामौली यांचा हा चित्रपट भारतीय इतिहासातील ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ या दोन वास्तविक जीवनातील नायकांच्या जीवनावर आधारित आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा चित्रपट बनवला जात आहे. केवळ दक्षिणेतच नाही तर जगभरात या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एमएम किरवाणी यांनी या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र अचानक वाढलेल्या कोविड केसेसमुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. अखेर 25 मार्च रोजी हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा:

“बॉलिवूडचे सर्व पाप धुवून टाकले”; ‘द काश्मीर फाईल्स’ पाहिल्यानंतर कंगनाचा टोला

प्रदर्शनाच्या एक दिवस आधी ‘द काश्मीर फाईल्स’मधील ‘या’ सीनवर लागली कात्री

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.