हे सर्व कधी संपेल? ब्रेस्ट कॅन्सरनंतर अभिनेत्रीला पुन्हा आरोग्याच्या समस्या, व्हिडीओ पाहून चाहतेही घाबरले

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री छवी मित्तलला गेल्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. शस्त्रक्रिया आणि रेडिओथेरेपीनंतर तिने यशस्वीरित्या कॅन्सरवर मात केली. मात्र आता पुन्हा तिला आरोग्याच्या नव्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. व्हिडीओ पाहून चाहतेसुद्धा घाबरले आहेत.

हे सर्व कधी संपेल? ब्रेस्ट कॅन्सरनंतर अभिनेत्रीला पुन्हा आरोग्याच्या समस्या, व्हिडीओ पाहून चाहतेही घाबरले
Chhavi MittalImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 10:42 AM

मुंबई : 28 ऑक्टोबर 2023 | कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणारी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री छवी मित्तल पुन्हा एकदा आरोग्याच्या नवीन समस्यांचा सामना करतेय. काही दिवसांपूर्वीच छवीच्या पायात हेयरलाइन फ्रॅक्चर झालं होतं, ज्याची माहिती तिने काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर आता सर्जरी केल्याच्या भागात सूज आल्याचं तिने सांगितलं आहे. आरोग्याच्या या सतत त्रासांमुळे ती वैतागली आहे आणि याविषयी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. ‘माहीत नाही हे सर्व कधी संपेल’, अशा शब्दांत तिने वेदना व्यक्त केल्या आहेत. 2022 मध्ये छवीला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी तिने हिंमतीने सर्व गोष्टींचा सामना केला. इतकंच नव्हे तर इतर कॅन्सर पीडितांसाठी ती प्रेरणा ठरली.

ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्यानंतर छवीला सर्जरी करावी लागली होती. त्यानंतर आपण कॅन्सरमुक्त झाल्याचं तिने चाहत्यांना सांगितलं होतं. मात्र आता सर्जरी केलेल्या भागावर सूज आल्याने ती चिंताग्रस्त झाली आहे. छवीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिच्या छातीत दुखत असल्याचं पहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ती मलमपट्टी पुन्हा करण्याविषयी बोलताना दिसली. ‘बायोप्सी रिपोर्ट्सची प्रतीक्षा आहे’, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.

हे सुद्धा वाचा

27 ऑक्टोबर रोजी छवीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. ‘काल रात्री मला सर्जरी केलेल्या जागी मोठी सूज आली. माहीत नाही हे सर्व कधी संपेल. कधी-कधी हे सगळं खूपच निराशाजनक होतं. मात्र मी सध्या बायोप्सी रिपोर्टची प्रतीक्षा करतेय’, असं तिने त्यात लिहिलं होतं. या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी छवीला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्याचसोबत ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी चाहत्यांनी प्रार्थना केली आहे.

एप्रिल महिन्यात छवीवर कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर बरी झाल्यानंतर छवीने कामालाही सुरुवात केली होती. जिममध्ये व्यायाम करतानाचेही फोटो तिने पोस्ट केले होते. छवीने आतापर्यंत ‘तीन बहुरानियाँ’, ‘तुम्हारी दृष्टी’, ‘घर की लक्ष्मी बेटियाँ’, ‘बंदिनी’ आणि ‘नागिन’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अशी ती अभिनेत्री आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.