पतीने मारलं, अन्याय झाला… अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने काढली बंदूक, केली ‘दादागिरी’
Chhaya Kadam | अभिनेत्रीने तिच्या वाट्याला आलेलं दुःख अखेर बोलून दाखवलंच... पतीकडून सतत होणारी मारहाण, तिच्यावर झालेल्या अन्याय... पण आता करते 'दादागिरी', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री छाया कदम यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा...
अभिनेत्री कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. अभिनेत्री छाया कदम गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहेत. छाया यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण प्रत्येक सिनेमात त्यांना अन्याय सहन करणाऱ्या महिलेच्या भूमिका साकाराव्या लागल्या. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यावर छाया यांनी खंत व्यक्त करत, ‘मडगाव एक्स्प्रेस’ सिनेमात साकारलेल्या हटके भूमिकेबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त छाया यांची चर्चा रंगली आहे.
नुकताच छाया यांनी दिग्दर्शिका किरण राव हिच्या ‘लापता लेडीज‘ सिनेमात भूमिका साकारताना दिसल्या. सिनेमात त्यांची भूमिका छोटी होती, पण फार दमदार होती. त्यानंत त्यांनी ‘मडगाव एक्सप्रेस’ सिनेमात दादागिरी करताना दिसल्या. ज्यामुळे अभिनेत्रीला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता आली.
छाया म्हणाल्या, ‘प्रत्येक सिनेमांत माझी जी भूमिका असते, ती गरीब महिलेची असते. अशा भूमिका करून मी त्रासली आहे. मी गरीब आहे. माझा पती मला मारहाण करतो.. माझा पती गुंड आहे… सतत दारू पितो… प्रत्येक वेळी असंच होतं… पण आता काही तरी वेगळं घडलं आहे..’
‘मला दादागिरी करायची आहे. मला बंदूक घेऊन सर्वत्र फिरायचं आहे. मी कुणाला याला म्हणाली देखील, इतक्या वर्षांची मी आता भडास काढणार आहे. फक्त बंदूकच नाही तर, दागिने, साडीमध्ये कुणाल याने माझा लूक पूर्ण केला.’ असं म्हणत छाया कदम यांनी आनंद व्यक्त केला.
‘मडगाव एक्सप्रेस’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा विनोदी आहे. सिनेमाचं दिग्दर्शन अभिनेता आणि दिर्गर्शक कुणाल खेमू याने केलं आहे. कुणाल याने सिनेमात छाया यांना हटके भूमिका दिली आहे. सिनेमा चाहत्यांना देखील प्रचंड आवडला. सिनेमात छाया यांच्यासोबत दिव्येंदु, प्रतीक गांधी, अविनाश तिवारी, नोरा फतेही, उपेंद्र लिमये यांची देखील मुख्य भूमिका आहे.
छाया यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. नुकताच झालेल्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये देखील त्यांनी हजेरी लावली होती.
छाया कदम यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी ‘लापता लेडीज’, ‘फ्रँड्री’, ‘सैराट’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘न्यूड’, ‘येरे येरे पावसा’, ‘हंपी’ यांसारख्या अनेक सिनेमामध्ये काम केलं आहे. सिनेमांमध्ये छाया यांनी भूमिका छोटी असली तरी चाहत्यांच्या लक्षात राहाणारी आहे.