गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानच्या घरी दाखल
गोळीबाराच्या घटनेनंतर अनेक लोक हे सलमान खान याला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहचत आहेत. आता नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सलमान खान याला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहचले आहेत.
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सलमान खान याच्या चाहत्यांमध्येही चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. या गोळीबाराच्या घटनेनंतर अनेक लोक हे सलमान खान याला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहचले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सलमान खान याला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहचले आहेत. रविवारी पहाटे ही गोळीबाराची घटना घडली.
सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी फोन करून चाैकशी केली होती. आता थेट एकनाथ शिंदे हे सलमान खान याच्या घरी दाखल झाले आहेत. लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे, तशी पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये.
दोन जणांनी दुचाकीवरून येत हा गोळीबार केला. हेच नाही तर गोळीबारीची संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. मुंबई पोलिसांनी या हल्लेखोरांना गुजरातमधून ताब्यात घेतले असून 10 दिवसांची पोलिस कोठडी या हल्लेखोरांना सुनावण्यात आलीये. आता काही मोठे खुलासे देखील होऊ शकतात.
लॉरेन्स बिश्नोई हा गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याचा जीवे मारण्याच्या धमक्या देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्येही त्याने थेट सलमान खान याला जीवे मारण्याचे आपले ध्येय असल्याचे देखील म्हटले होते. मेलवरूनही सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्याने मोठी खळबळ बघायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून या गोळीबाराची प्लॅनिंग सुरू होती. सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीवर हा गोळीबार करण्यात आला. हेच नाही तर एक गोळी सलमान खान याच्या घरात देखील सांगितले जातंय. या गोळीबाराच्या तपासासाठी तब्बल 20 पथके तयार करण्यात आली होती.