कन्नड भाषेत बोलला नाही म्हणून अधिकाऱ्याने दिली अशी वागणूक; संतप्त कोरिओग्राफरने पोस्ट केला व्हिडीओ

सलमानला या घटनेची तक्रार करायची होती, परंतु ते कसं करावं याबद्दल कोणतीही मदत मिळालं नसल्याचं त्याने सांगितलं. यापुढे त्याने असंही म्हटलंय की त्याला 'बँगलोरीयन' असल्याचा अभिमान आहे, पण स्थानिक भाषा नीट माहित नसल्यामुळे अपमानित करणं योग्य नाही.

कन्नड भाषेत बोलला नाही म्हणून अधिकाऱ्याने दिली अशी वागणूक; संतप्त कोरिओग्राफरने पोस्ट केला व्हिडीओ
Salman Yusuff Khan Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 8:38 AM

बेंगळुरू : प्रसिद्ध कोरिओग्राफर सलमान युसुफ खान याच्यासोबत बेंगळुरू एअरपोर्टवर धक्कादायक घटना घडली. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत त्याने या घटनेची माहिती दिली. बुधवारी तो दुबईला जाण्यासाठी बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला होता. त्यावेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला कन्नड भाषेत बोलण्यास सांगितलं. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या वाईट वागणुकीनंतर त्याने इनस्टाग्रामवर लाइव्ह येत घडलेली हकिकत सांगितली.

केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला टॅग करत त्याने लिहिलं, ‘मी दुबईला जाण्यासाठी निघालोय आणि इथे या इमिग्रेशन अधिकाऱ्याला भेटलो, ज्याने मला कन्नड भाषेत बोलण्यास सांगितलं. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की मी कन्नड भाषा समजू शकतो पण मी ती नीट बोलू शकत नाही. त्यावर तो अधिकारी माझ्याशी कन्नड भाषेतच बोलत राहिला. त्याने माझ्या पासपोर्टकडे बोट दाखवून त्यावरील माझं नाव, माझं जन्मस्थळ, माझ्या बाबांचं नाव आणि त्यांचं जन्मस्थळ यांकडे लक्ष वेधलं. तू आणि तुझे वडील बेंगळुरूमध्ये जन्माला आले आणि तरी तुम्हाला कन्नड बोलता येत नाही असं ते मला म्हणाले. त्यावर मी त्यांना म्हणालो की बेंगळुरूमध्ये जन्माला आल्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला भाषा आलीच पाहिजे.’

हे सुद्धा वाचा

‘मी बेंगळुरूत जन्माला आलो असलो तरी जगभरात मी प्रवास करू शकलो. सौदीमध्ये मी लहानाचा मोठा झालो. त्यावर त्या अधिकाऱ्यांनी मला म्हटलं, जर तुम्हाला कन्नड बोलता येत नसेल तर मी तुमच्यावर संशय घेऊ शकतो’, असं त्याने पुढे लिहिलं. त्याचप्रमाणे शालेय शिक्षणादरम्यान देशात न राहिल्यामुळे कन्नड भाषा येत नसल्याचं सलमानने या पोस्टमध्ये स्पष्ट केलं. फक्त मित्रांमुळे थोडीफार भाषा समजत असल्याचं तो म्हणाला.

पहा व्हिडीओ

सलमानने हिंदी बोलण्याचा प्रयत्न केला तरी त्याला कोणत्याही गोष्टीसाठी संशयित मानलं जाऊ शकतं, असं संबंधित अधिकारी म्हणाला. सलमानने वारंवार त्या अधिकाऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही ते ऐकण्यास तयार होते. “तुमच्यासारखे अशिक्षित लोक जर या देशात राहत असतील तर हा देश कधीच मोठा होणार नाही, हे मी त्या अधिकाऱ्याला चिडून म्हणालो. त्यावरही त्यांनी मान खाली घालून बडबडण्यास सुरुवात केली”, असं सलमानने पुढे लिहिलं.

सलमानला या घटनेची तक्रार करायची होती, परंतु ते कसं करावं याबद्दल कोणतीही मदत मिळालं नसल्याचं त्याने सांगितलं. यापुढे त्याने असंही म्हटलंय की त्याला ‘बँगलोरीयन’ असल्याचा अभिमान आहे, पण स्थानिक भाषा नीट माहित नसल्यामुळे अपमानित करणं योग्य नाही.

2009 मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमधून सलमान प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याने बऱ्याच टीव्ही शोजमध्ये भाग घेतला. याशिवाय वाँटेड, एबीसीडी, स्ट्रीट ड्रान्सर थ्रीडी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिकाही साकारल्या आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.