कलाविश्वाला मोठा धक्का… सलमान खान याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

सलमान खान याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन... सेलिब्रिटी आणि चाहते त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये होणार अंत्यसंस्कार...

कलाविश्वाला मोठा धक्का... सलमान खान याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 8:35 AM

मुंबई : अभिनेता सलमान खान याने अनेक दिग्गज व्यक्तींसोबत काम केलं. सलमान खान, अभिनेत्री राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा स्टारर ‘चोरी चोरी चुपके चुपके’ (Chori Chori Chupke Chupke)सिनेमाचे निर्माते नझीम हसन रिझवी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. नझीम हसन रिझवी यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. नझीम हसन रिझवी गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. नझीम हसन रिझवी यांच्या निधनानंतर बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं आहे… असं म्हणायला हरकत नाही. (producer nazim hasan rizvi)

मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात नझीम हसन रिझवी यांचं निधन झालं आहे. नझीम हसन रिझवी यांच्यावर उत्तर प्रदेश याठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत. नझीम हसन रिझवी यांच्या निधनाने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. वादग्रस्त व्यक्तीमत्त्व म्हणून देखील नझीम हसन रिझवी यांची ओळख होती. मंगळवारी त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण नझीम हसन रिझवी यांनी उपचारादरम्यान सोमवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. सध्या सर्वत्र नझीम हसन रिझवी यांची चर्चा सुरु आहे. नझीम हसन रिझवी यांनी बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष काम केलं. शिवाय ते वादग्रस्त भूमिकांमुळे देखील चर्चेत आले.

नझीम हसन रिझवी यांनी ‘मजबूर लडकी’ (१९९१), ‘अंगारवादी’ (१९९८), ‘अंडरट्रायल’ (२००७), ‘सीसी,सीसी’ (२००१), ‘हॅलो, हम लल्लन’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. शिवाय ‘बोल रहे है’, ‘अपने बेटे आझीम को’, ‘कसम से कसम से’ आणि ‘लादेन आला रे आला’ यांसारख्या सिनेमांची निर्मिती केली.

नझीम हसन रिझवी यांनी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांची निर्मिती केली. पण सलमान खान, अभिनेत्री राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा स्टारर ‘चोरी चोरी चुपके चुपके’ सिनेमाने चाहत्यांच्या मनात घर केलं. सिनेमात अभिनेता सलमान खान याने पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली होती.

प्रेमकथे भोवती फिरणाऱ्या सिनेमाला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळालं. ‘चोरी चोरी चुपके चुपके’ सिनेमाने बॉक्स ऑफिस देखील तुफान कमाई केली. आजही सिनेमातील गाणी चाहत्यांच्या मनात आहेत. अशात नझीम हसन रिझवी यांच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.