‘मृतदेहावर रडल्यानंतर पैसे मिळतील…’, चंकी पांडेला ‘त्या’ ठिकाणी पांढऱ्या कपड्यांमध्ये बोलावलं आणि…

Chunky Panday: शुटिंगला जात असलेल्या चंकी पांडेला आलेला 'तो' फोन, पांढऱ्या कपड्यांमध्ये एका ठिकाणी पोहोचलेल्या चंकीला सांगण्यात आलं. 'मृतदेहावर रडल्यानंतर पैसे मिळतील...', सध्या सर्वत्र चंकी पांडेने सांगितलेल्या घटनेची चर्चा...

'मृतदेहावर रडल्यानंतर पैसे मिळतील...',  चंकी पांडेला 'त्या' ठिकाणी पांढऱ्या कपड्यांमध्ये बोलावलं आणि...
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 9:53 AM

Chunky Panday: अभिनेता चंकी पांडे गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असला तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतो. आता देखील अभिनेता एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. सांगायचं झालं तर, चंकी पांडे नुकताच विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पोहोचला होता. शोमध्ये अभिनेत्याने करियरच्या सुरुवातीचा एक किस्सा सांगितला. अभिनेत्याने सांगितलेला किस्सा ऐकल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल.

नुकताच झालेल्या द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये शक्ती कपूर, चंकी पांडे आणि गोविंदा उपस्थित होते. शोमध्ये सर्वांनी त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. चंकी पांडे म्हणाला, ‘करियरच्या सुरुवातीची गोष्ट आहे. तेव्हा अधिक कमाईसाठी कार्यक्रमांमध्ये जायचो.. तेव्हा एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी बोलावण्यात आलं होतं…’

‘सुरुवातीच्या काळात कर्यक्रमांमध्ये जाणं हाच एक अधिक कमाईसाठी पर्याय होता. माझी एक बॅग तयारच असायची. ज्याने मला बोलावलं त्याच्याकडे मी माझी बॅग घेऊन धावत जायचो… लग्न असो, वाढदिवस असो… एके दिवशी सकाळी मला एका आयोजकाचा फोन आला, त्याने विचारले, ‘आज काय करताय?’ मी त्याला म्हणालो, ‘मी फक्त शूटिंगसाठी जात आहे.

हे सुद्धा वाचा

‘त्याने मला विचारलं फिल्म सिटीमध्ये आहे का शुटिंग? मी म्हणलो, हो… पुढे आयोजक म्हणाला, ‘रस्त्यातच एक कार्यक्रम आहे. फक्त 10 मिनिटं लागतील… पैसे चांगले मिळत आहेत…’ असं देखील आयोजक म्हणाला…’ त्या आयोजकाने अभिनेत्याला पांढऱ्या कपड्यांमध्ये बोलावलं.

पुढे पांडे म्हणाला, ‘मी देखील पांढऱ्या कपड्यांमध्ये पोहोचलो. तेथे एका व्यक्तीचं निधन झालं होतं आणि मला रडण्यासासाठी बोलावलं होतं. आयोजकाने मला सांगितलं, तुम्ही रडल्यानंतर पैसे मिळतील… आणि खरंच असं झालं होतं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त चंकी पांडेची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्याच्या फिल्मी करियरबद्दल सांगायचं झालं तर, 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आग’ सिनेमातून चंकी पांडेने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर ‘तेजाब’, ‘आंखें’, ‘तिरछी टोपीवाले’, ‘दे दना दन’ आणि ‘हाउसफुल’ यांसारख्या सिनेमात अभिनेता झळकला. आता चंकी पांडे लवकरच ‘हाउसफुल 5’ सिनेमात दिसणार आहे.

ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?.
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?.