अखेर आदित्य राॅय कपूर आणि लेकीच्या अफेअरबद्दल चंकी पांडेचे मोठे विधान, म्हणाले, ती माझ्यापेक्षाही अधिक..
चंकी पांडे यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. आता चंकी पांडेंची लेक अनन्या पांडे ही चित्रपटामध्ये धमाका करताना दिसते. अनन्या पांडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनन्या पांडे सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते.
अभिनेता चंकी पांडे यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. चंकी पांडे यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. आता चंकी पांडे यांच्यानंतर त्यांची लेक अनन्या पांडे ही चित्रपटात धमाल करताना दिसत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडे ही तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. अनन्या पांडे ही अभिनेता आदित्य राॅय कपूर याला डेट करत आहे. दोघांच्या वयात मोठे अंतर देखील आहे. काही दिवसांपूर्वीच विदेशात खास वेळ घालवताना अनन्या पांडे आणि आदित्य राॅय कपूर दिसले.
अनन्या पांडे आणि आदित्य राॅय कपूर यांनी अजूनही त्यांच्या नात्यावर काहीच भाष्य केले नाहीये. आता नुकताच चंकी पांडे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही गोष्टींबद्दल जाहिरपणे बोलताना चंकी पांडे हे दिसले आहेत. यावेळी चंकी पांडे यांना अनन्या पांडे आणि आदित्य राॅय कपूर यांच्या रिलेशनबद्दल देखील विचारण्यात आले.
चंकी पांडे म्हणाले की, माझ्या मुलीला जे करावे वाटते ती ते करते, मी तिला पूर्ण परवानगी दिलीये. ती आता 25 वर्षांची झालीये. हेच नाही तर ती माझ्यापेक्षा अधिक पैसेही कमावते. आता माझी काय हिंमत आहे माझ्या 25 वर्षाच्या मुलीला हे म्हणायची की, तू हे नको करू ते नको करू. आता चंकी पांडे यांच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
अनन्या पांडे हिने गहराइया चित्रपटात इंटीमेट सीन दिले. याबद्दल चंकी पांडे म्हणाले की, मला त्यामध्ये काही चुकीचे वाटत नाही. हॉलिवूडमध्ये हे सर्वकाही बघितले आहे, त्यामुळे यामध्ये काही नुकसान नाहीये. पहिल्यांदाच यावर बोलताना चंकी पांडे हे दिसले आहेत. नेहमीच आदित्य राॅय कपूर आणि अनन्या पांडे हे स्पाॅट होताना दिसतात.
आदित्य राॅय कपूर आणि अनन्या पांडे हे लवकरच लग्न करणार असल्याची देखील मध्यंतरी जोरदार चर्चा रंगताना दिसली. आदित्य राॅय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या नात्याला एकप्रकारे परवानगी दिल्याचेच चंकी पांडे याच्याकडून सांगण्यात आले. अनन्या पांडे ही चित्रपटांमध्ये चांगलेच धमाके करताना दिसत आहे. सोशल मीडियावरही अनन्या पांडे सक्रिय असते.
काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिने मुंबईमध्ये फ्लॅट खरेदी केला. आपल्या नवीन घराची झलक चाहत्यांना दाखवताना देखील अनन्या पांडे ही दिसली. विशेष म्हणजे अनन्या पांडे हिच्या घराचे डिझाईन गाैरी खान हिने केले. अगदी कमी कालावधीमध्ये अनन्या पांडे हिने वेगळी ओळख मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी लाईगर चित्रपटात देखील अनन्या पांडे दिसली.