अंतर्गत राजकारणामुळे CID मालिका बंद पाडण्यात आली? दयाने सांगितलं सत्य

छोट्या पडद्यावर सर्वाधिक गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'सीआयडी'. या मालिकेनं तब्बल 21 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आजही ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला यावी, अशी अनेकांची इच्छा आहे. मात्र ही मालिका का बंद झाली, यामागचं कारण दयानंद शेट्टीने सांगितलं आहे.

अंतर्गत राजकारणामुळे CID मालिका बंद पाडण्यात आली? दयाने सांगितलं सत्य
CID serialImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 2:55 PM

मुंबई : 1 फेब्रुवारी 2024 | ‘सीआयडी’ हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक होता. या मालिकेचा पहिला एपिसोड 1998 मध्ये प्रसारित झाला. तेव्हापासून तब्बल 1500 एपिसोड्स ऑन एअर करण्यात आले. आजही या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सीआयडी एका नव्या सिझनसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला यावा, अशी असंख्य जणांची इच्छा आहे. तब्बल 21 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2018 मध्ये या मालिकेने निरोप घेतला. या मालिकेतील दयाची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टी याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मालिकेविषयी मोठा खुलासा केला आहे. अंतर्गत राजकारणामुळे ही मालिका बंद करण्यात आली, असं त्याने म्हटलंय.

‘सीआयडी’ या मालिकेत दयानंद शेट्टी, शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव, अलाना सय्यद, अजय नागरथ, दिनेश फडणीस, तान्या अब्रॉल यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. युट्यूबर लक्ष महेश्वरीला दिलेल्या मुलाखतीत दयानंदने मालिका संपण्यामागचं धक्कादायक कारण सांगितलं आहे. अंतर्गत राजकारणामुळे ही मालिका बंद करण्यात आली, असं त्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

याविषयी बोलताना दया म्हणाला, “आम्हाला असं वाटतं की 21 वर्षांपासून ज्या गतीने आणि ज्या क्रेझने ही मालिका सुरू होती, त्यानुसार ती बंद करायला पाहिजे नव्हती. यात काही अंतर्गत राजकारण असू शकतं किंवा मी याला नियती असं म्हणेन. तरीसुद्धा आम्हाला असं वाटतं की कुठेतरी ही मालिका बंद पाडण्यात आली.”

‘सीआयडी’ ही टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका होती. या मालिकेत भूमिका साकारणारा प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. ही मालिका बरीच वर्षे चालली असली तरी त्यात काही कलाकार सतत बदलत गेले. असं असूनही अवघे काही वर्षे काम केलेल्या कलाकारांनाही यशस्वी करिअर मिळालं. 2018 मध्ये मालिका बंद झाल्यानंतर 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान पुन्हा एकदा CID चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.