CID मधील ‘फ्रेडरिक्स’च्या निधनानंतर एसीपी प्रद्युमन यांची भावूक पोस्ट
'सीआयडी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते दिनेश फडणीस यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. मालिकेत ते फ्रेडरिकची भूमिका साकारत होते. त्यांच्या निधनानंतर मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला.
मुंबई : 6 डिसेंबर 2023 | ‘सीआयडी’ या मालिकेनं बरीच वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. यात फ्रेडरिकची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचं 5 डिसेंबर रोजी निधन झालं. यकृताच्या समस्येमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. दिनेश यांच्या निधनाने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सीआयडी या मालिकेच्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली. शिवाजी साटम, तान्या अब्रॉल, श्रद्धा मुसळे, अजय नागरथ आणि विवेक माश्रू यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दिनेश फडणीस यांनी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यकृत निकामी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सीआयडी मालिकेतील सहकलाकार दयानंद शेट्टीने सर्वांत आधी दिनेश यांच्या निधनाची माहिती दिली. ‘सीआयडी’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता अजय नागरथने मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. ‘तू आम्हाला सोडून गेलास, यावर अजूनही विश्वास बसत नाही. तुझ्या आत्म्याला शांती मिळो. फ्रेडी सर तुम्ही कायम आमच्या हृदयात राहाल. ओम शांती’, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.
View this post on Instagram
View this post on Instagram
मालिकेत ‘डॉ. तारिका’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा मुसळेनं लिहिलं, ‘फ्रेडी सर आम्हाला तुमची खूप आठवण येईल.’ एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारणारे अभिनेते शिवाजी साटम यांनीसुद्धा दिनेश यांच्या फोटोंचा एक कोलाज पोस्ट केला. ‘दिनेश फडणीस, साधा, विनम्र, प्रेमळ’, असं त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. तान्या अब्रॉल आणि विवेक माश्रू यांनीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला.
View this post on Instagram
दिनेश फडणीस यांना 1 डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून अभिनेता दयानंद शेट्टी सतत सोशल मीडियावर त्यांच्या आरोग्याविषयीची अपडेट्स देत होता. 5 डिसेंबर रोजी रात्री 12.08 वाजता दिनेश यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतल्या तुंगा हॉस्पीटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.