इरफान खानच्या मृत्यूनंतर 4 वर्षांनी जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा, कसे होते अभिनेत्याचे शेवटचे क्षण?

Irrfan Khan Death: '10 दिवस आधीच माहिती होते इरफान जाणार आहे, म्हणून...', इरफान खानच्या मृत्यूनंतर 4 वर्षांनी जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा, तुमच्याही डोळ्यत येईल पाणी..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा...

इरफान खानच्या मृत्यूनंतर 4 वर्षांनी जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा, कसे होते अभिनेत्याचे शेवटचे क्षण?
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 10:22 AM

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) याच्या मृत्यूला 4 वर्ष झाली आहे. 29 एप्रिल 2020 मध्ये अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनाच्या 4 वर्षांनंतर अभिनेत्री मीता वशिष्ठ हिने मोठा खुलासा केला आहे. मीता वशिष्ठ देखील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, मीता वशिष्ठ हिने इरफान खान याच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा केला. 10 दिवसांपूर्वीच माहिती होतं इरफान जगाचा निरोप घेणार आहे… असं म्हणत अभिनेत्रीने ते शेवटचे क्षण सांगितले.

नुकताच झालेल्या मुलाखतीत मीता वशिष्ठ म्हणाली, ‘मी आणि इरफान खान याची पत्नी सुतापा कॉलेजपासून मैत्रिणी होतो… इरफान याच्या निधनाच्या 10 दिवसांपूर्वी माझ्या स्वप्नात आम्ही गप्पा मारल्या होत्या. स्वप्नात इरफान मला म्हणाला, खूप दिवस झाले आहेत आपण भेटलो नाही… आम्ही प्रचंड आनंदात होतो. जवळपास 45 मिनिटं आम्ही बोलत होतो…’

‘जेव्हा झोपेतून उठली तेव्हा मन समाधानी आणि चेहऱ्यावर आनंद होता. तेव्हाच मी इरफानला भेटण्याचा विचार केला. 1-2 दिवसांत जाणार आहे. तो नाही जिवंत राहाणार. तेव्हा मी एका मित्राला फोन केला आणि विचारलं इरफान कुठे आहे? मला त्याला भेटायचं आहे… तेव्हा मित्र म्हणाला, तो कोणालाच भेटत नाही, सध्या कुटुंबासोबत आहे…’

हे सुद्धा वाचा

इरफानच्या शेवटच्या क्षणांबद्दल मीता म्हणाल्या, ‘लॉकडाऊनचे दिवस होते. माझा मित्र अशोक मेरे माझ्याकडे आला आणि म्हणाला मीता जायचं आहे अंत्यसंस्कारासाठी? मी म्हणजे जायचं आहे. आम्ही त्याठिकाणी गेला. पण गार्डने आम्हाला आत जाऊ दिलं नाही. मी बॅरिकेटच्या जवळ उभी होती. त्याचं पार्थिव अखेर दिसलं… तेव्हा मी माझ्या मित्राला म्हणाली ‘बघ आला आता गुडबाय म्हणायला…’, इरफान खान याच्या निधनामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता.

कोण आहे मीता वशिष्ठ?

अभिनेत्री मीता वशिष्ठ हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘स्वाभिमान’, ‘किरदार’, ‘हिप हिप हुर्रे’, ‘खौफ’, ‘कौन’, ‘भारत एक खोज’ आणि ‘कोई लौट के आया है’ यांसारख्या मालिकांमध्ये अभिनेत्रीने काम केलं आहे. तर ‘चांदनी’, ‘बेवकूफ़’, ‘गुलाम’, ‘ताल’ आणि ‘गंगूबाई’ या सिनेमामध्ये देखील मीता वशिष्ठ हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.