Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संगीत रंगभूमीच्या व्रतस्थ शिलेदार हरपल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली

'संगीत रंगभूमीलाच आपला श्वास,ध्यास मानणाऱ्या व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीच्या परंपरेशी नव्या पिढीला जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळला. कीर्तीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली', अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

संगीत रंगभूमीच्या व्रतस्थ शिलेदार हरपल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली
उद्धव ठाकरे, कीर्ती शिलेदार,
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 12:45 PM

मुंबई : ‘संगीत रंगभूमीलाच आपला श्वास,ध्यास मानणाऱ्या व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीच्या परंपरेशी नव्या पिढीला जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळला. कीर्तीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली’, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ गायिका(singer) आणि संगीत नाटक कलाकार ( musical artist) कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांचे आज निधन झालं. त्यांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘मराठी संगीत रंगभूमीच्या वैभव जतनाचे मोठे श्रेय शिलेदार कुटुंबियांना जाते. ज्येष्ठ रंगकर्मी जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी आपल्या साधनेतून संगीत नाटक हे घराघरात पोहोचवले. त्याच पंक्तीत पुढे जाऊन त्यांच्या कन्या ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांनी संगीत रंगभूमीची सेवा केली. त्यांनी नव्या पिढीला संगीत नाटक आणि त्याचा दिमाख दाखवून दिला. संगीत रंगभूमीलाच त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीच्या परंपरेत पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळला आहे. त्यांचे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल’, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अजित पवारांकडून कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली

‘ज्येष्ठ अभिनेत्री, शास्त्रीय गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीला समर्पित महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलेल्या कीर्तीताईंनी आपल्या सुरेल गायन आणि सदाबहार अभिनयानं मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. देशविदेशात स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला. आई जयमाला आणि वडील जयराम शिलेदार यांचा कलेचा वारसा पुढं नेताना मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात योगदान दिलं. त्यांचं निधन ही मराठी रंगभूमी, महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. मी कीर्तीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो’, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अमित देशमुख यांच्याकडून श्रद्धांजली

कीर्तीताईंनी आपल्या आई-वडिलांकडून मिळालेला संगीत आणि अभिनयाचा वारसा जपला आणि पुढे वाढवत नेला.आपल्या गोड गायनाने आणि प्रसन्न अभिनयाने कीर्तीताईंनी रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. संगीत रंगभूमीची सेवा करण्याचे आई-वडिलांचे व्रत त्यांनीही जोपासले आणि खूप कष्ट सोसून संगीत रंगभूमी जागती ठेवली. त्यांचे हे उपकार संगीत रंगभूमी कधीही विसरू शकणार नाही, असं म्हणत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नाटकांचे 4000 हून अधिक प्रयोग

कीर्ती शिलेदार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी साहित्य शाखेच्या पदवी घेतली होती. त्यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर 4000 हून अधिक प्रयोग झाले आहेत. देशातल्या मराठी रसिकांसाठी त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली.

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते जयराम शिलेदार व अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या त्या कन्या होत. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं . त्यांनी संगीत कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी, संशय कल्लोळ, स्वयंवर, संगीत सौभद्र, मृच्छ कटिक, मंदोदरी, एकच प्याला या सारख्या नाटकांना कीर्ती शिलेदार यांचा सूर मिळाला.अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषविलं.

संबंधित बातम्या

Kirti Shiledar| ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाटक कलाकार कीर्ती शिलेदार यांचे निधन ; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कीर्ती शिलेदार याच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचं मोठं नुकसान, अजित पवारांकडून श्रद्धांजली

अमोल कोल्हेंच्या समर्थनार्थ नाना पाटेकर मैदानात, म्हणाले, भूमिका केली म्हणजे…

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.