‘सॉरी, माझ्याकडे इतका वेळ नाही…’, Pathaan सिनेमावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य

उत्तर प्रदेश येथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिनेमाच्या अनेक मुद्द्यांवर स्वतःची भूमिका मांडली. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी सिनेमावर घालण्यात येणाऱ्या बहिष्काराबद्दल मोठं वक्तव्य केलं

'सॉरी, माझ्याकडे इतका वेळ नाही...', Pathaan सिनेमावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य
'सॉरी, माझ्याकडे इकता वेळ नाही...', Pathaan सिनेमावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 12:34 PM

CM Yogi Adityanath On SRK Pathaan : अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. पण ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आज सिनेमा प्रदर्शित होवून ११ दिवस झाले आहेत. पण तरी देखील सिनेमाची चर्चा कमी होत नसल्याचं चित्र दिसत आहे. अशात उत्तर प्रदेश येथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिनेमाच्या अनेक मुद्द्यांवर स्वतःची भूमिका मांडली. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी सिनेमावर घालण्यात येणाऱ्या बहिष्काराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या पठाण सिनेमावर केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चर्चेत आहेत.

शाहरुख खान स्टाररर ‘पठाण’ सिनेमाबाबत प्रश्न विचारताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘सॉरी, मी सिनेमा पाहू शकत नाही. माझ्याकडे इतका वेळ नाही. कारण 25 कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात… मी कलाकारांचा आदर करतो, साहित्यकारांचा आदर करतो, ज्यांच्यामध्ये कोणती प्रतिभा असेल त्यांचा मी आदर करतो. माझ्याकडे सिनेमा पाहण्यासाठी वेळ नाही, पण आम्ही कलाकारांचा आदर करतो. एवढंच नाही तर, वैयक्तिक आणि शासकीय स्तरावर त्यांचा आदर करतो.’ असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

मुंबईत बॉलिवूड कलाकारांना भेटल्यानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले… ‘मुंबई याठिकाणी मी उत्तर प्रदेशच्या ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचा रोड शो घेवून गेलो होतो. रोड शोमध्ये मी उद्योगपतींबरोबरच गुंतवणूकदारांचीही भेट घेतली होती. वित्तीय संस्थांचे प्रमुख आणि बँकांच्या प्रमुखांसोबत माझी दुसरी बैठक झाली. तिसरी बैठक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यासोबत झाली. ‘

हे सुद्धा वाचा

‘तिन्ही बैठकींमध्ये प्रत्येकाकडून सकारात्मक प्रतिसाद होता. कारण लवकरच उत्तर प्रदेशमध्ये आमची फिल्म सीटी येणार आहे. त्यामुळे आम्ही सतत अनेक क्षेत्रातील व्यक्तींसोबत चर्चा करत आहोत. या कार्यक्रमाला मोठं कसं करु शकतो… यासाठी देखील सल्ला घेतला आहे…’ असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

पठाण सिनेमावर घालण्यात येणाऱ्या बहिष्काराबद्दल देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं. ‘उत्तर प्रदेश याठिकाणी काधीही कोणताही विरोध झालेला नाही. एका ठिकाणी वाद झाला. पण एक प्रेक्षक फिल्मची रिल बनवत असल्याचं लक्षात येताच सिनेमागृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. याशिवाय कोणताही वाद झालेला नाही.’

पुढे योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘आपण एका गोष्टीकडे कायम लक्ष द्यायला हवं. जेव्हा कोणताही सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होतो, तेव्हा लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. वातावरण तापेल अशी कोणतीही परिस्थिती निर्माण करण्याची आणि भावना भडकवण्याची परवानगी कोणालाही देऊ नये.’ असं देखील योगी आदित्यनाथ म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.