भर कार्यक्रमात अभिनेत्रीसोबत विद्यार्थ्याची वाईट कृती; व्हिडीओ व्हायरल होताच भडकले चाहते

या कार्यक्रमात कॉलेजमधल्या एका विद्यार्थ्याने मंचावर येऊन अपर्णाला तिच्या परवानगीविरुद्ध स्पर्श केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अपर्णाचे संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या कॉलेजवर राग व्यक्त करत आहेत.

भर कार्यक्रमात अभिनेत्रीसोबत विद्यार्थ्याची वाईट कृती; व्हिडीओ व्हायरल होताच भडकले चाहते
कन्नड अभिनेत्री अपर्णा बालामुरलीला चुकीच्या पद्धतीने केला स्पर्शImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 12:30 PM

केरळ: साऊथ सुपरस्टार सूर्यासोबत ‘सूरराय पोट्रू’ या चित्रपटात भूमिका साकारल्यानंतर कन्नड अभिनेत्री अपर्णा बालामुरलीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. सध्या ती तिच्या ‘थँकम’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटातील सहकलाकारांसोबत तिने नुकतीच एका कॉलेजच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात कॉलेजमधल्या एका विद्यार्थ्याने मंचावर येऊन अपर्णाला तिच्या परवानगीविरुद्ध स्पर्श केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अपर्णाचे संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या कॉलेजवर राग व्यक्त करत आहेत.

एक विद्यार्थी अचानक मंचावर येऊन अपर्णासोबत फोटो काढण्याची विनंती करतो. यासाठी तो तिचा हाथ पकडून तिला पुढे आणतो आणि नंतर परवानगीशिवाय तिच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्याने स्पर्श करताच अपर्णा संकोचल्यासारखी होते.

हे सुद्धा वाचा

अपर्णाला अन्कफर्टेबल झाल्याचं पाहिल्यानंतर तो विद्यार्थी मंचावर हात जोडून तिची माफी मागतो. मात्र या घटनेबाबत मंचावर उपस्थित असलेले कॉलेज प्रशासनाचे अधिकारी काहीच बोलत नाहीत. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अपर्णाचे चाहते भडकले आहेत.

पहा व्हिडीओ

‘एखाद्या व्यक्तीसोबत वागताना आपली मर्यादा ओलांडली नाही पाहिजे. आश्चर्याची बाब म्हणजे मंचावर असलेल्यांपैकी कोणीच तिच्या मदतीला धावून आलं नाही’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘ही अत्यंत वाईट घटना आहे’ असं दुसऱ्याने म्हटलंय. एका युजरने ट्विटरवर कोची पोलिसांना टॅग करत लिहिलं, ‘कृपया या घटनेकडे लक्ष द्यावं. एखाद्याच्या पर्सनल स्पेसचं हे स्पष्टपणे उल्लंघन आहे.’

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कोचीमधल्या एका मॉलमध्ये प्रमोशनसाठी गेलेल्या दोन अभिनेत्रींसोबतही अशाच पद्धतीची घटना घडली होती. ‘सॅटर्डे नाइट’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या दोघी अभिनेत्री केरळमधील कोझिकोड इथल्या हिलाइट मॉलमध्ये पोहोचल्या होत्या. या मॉलमध्येच अभिनेत्रींसोबत गैरवर्तणूक झाली होती.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.