Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी ड्रग्स ॲडिक्ट, सेक्स ॲडिक्ट पण कधीच…’, प्रसिद्ध कॉमेडियनने बलात्काराच्या आरोपांवर सोडलं मौन

प्रसिद्ध कॉमेडियनवर बलात्कार आणि लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. चार महिलांनी कॉमेडियवर गंभीर आरोप केले आहेत. चार महिलांच्या तक्रारींनंतर 18 महिन्यांच्या चौकशीनंतर कॉमेडियनवर आरोप लावण्यात आले आहेत. यावर कॉमेडियनने स्पष्टीकरण दिलं आहे.

'मी ड्रग्स ॲडिक्ट, सेक्स ॲडिक्ट पण कधीच...', प्रसिद्ध कॉमेडियनने  बलात्काराच्या आरोपांवर सोडलं मौन
Follow us
| Updated on: Apr 05, 2025 | 9:21 AM

ब्रिटिश पोलिसांनी शुक्रवारी कॉमेडियन रसेल ब्रँडवर बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप केला. चार महिलांनी केलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारींनंतर 18 महिन्यांच्या चौकशीनंतर हे आरोप लावण्यात आले आहेत. लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितल्यानुसार, 50 वर्षीय ब्रँडवर बलात्काराचा, प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा, आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, अभिनेत्याने आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित गुन्ह्यांमध्ये चार महिलांचा समावेश आहे आणि हे प्रकरण 1999 ते 2005 दरम्यान घडलं आहे. रिपोर्टनुसार, ही घटना सप्टेंबर 2023 मध्ये उघडकीस आली. काही वृत्त संस्थांनी चार महिलांनी रसेल यावर लावलेले आरोप समोर आणल्यानंतर कॉमेडियनच्या अडचणीत वाढ झाली आहे.

चार महिलांनी केलेले आरोप फेटाळत कॉमेडियन रसेल ब्रँडने स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत कॉमेडियन रसेल ब्रँड म्हणाला, ‘मी कायम तुम्हा सर्वांना सांगत आलो आहे. जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मी एकटा होतो. माझी पत्नी आणि मुलांच्या आधी मी एकटा होतो. मी एक मुर्ख व्यक्ती होतो. मी ड्रग्स ॲडिक्ट आहे, मी सेक्स ॲडिक्ट आहे पण मी कधीच कोणाचा बलात्कार केला नाही. मी कधीही कोणत्याही गैर-सहमतीच्या कार्यात भाग घेतला नाही…’ असं म्हणत त्याने स्वतःची बाजू स्पष्ट केली.

कोण आहे रसेल ब्रँड

रसेल ब्रँड हा एक कॉमेडियन आणि अभिनेता आहे ज्याने रेडिओ आणि टेलिव्हिजनवर कार्यक्रम आयोजित केले आहेत. ब्रँड अनेक हॉलिवूड सिनेमांमध्ये देखील दिसला आहे आणि 2010 आणि 2012 दरम्यान पॉप स्टार कॅटी पेरीशी विवाह केला होता. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.  सोशल मीडियावर देखील रसेल ब्रँडच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर रसेल कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.

लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?.
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?.
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू.
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू.
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज.