पांडा आणि गेंडी म्हणणाऱ्यांवर भडकली भारती सिंह, थेट म्हणाली, हे लोक..
भारती सिंह हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. भारती सिंहची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे भारती सिंह ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकिन आहे. नुकताच भारती सिंह हिने मोठा खुलासा केलाय. ज्याची आता जोरदार चर्चा होताना दिसतंय.
कॉमेडियम भारती सिंह ही कायमच चर्चेत असते. भारती सिंह ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. हेच नाही तर भारती सिंहची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच भारती सिंहला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारती सिंहची शस्त्रक्रिया देखील झालीये. नेहमीच भारती सिंह लोकांना पोटधरून हसवताना दिसते. भारती सिंह आपल्या खासगी आयुष्यात काय सुरू आहे, याची माहिती आपल्या चाहत्यांसोबत कायमच शेअर करताना दिसते. भारती सिंह व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकताच भारती सिंह हिने मोठा संताप व्यक्त केलाय. हेच नाही तर ट्रोलर्सला खडेबोल सुनावताना भारती सिंह दिसलीये. भारती सिंह म्हणाली की, लोक माझ्याबद्दल काय विचार करतात आणि मला काय बोलतात याचा मला काहीच फरक पडत नाही. जे आपल्या स्वत: च्या आयुष्यात काहीच करू शकत नाहीत ते चुकीच्या गोष्टी बोलतात.
मी एखादा सुंदर आणि चांगला फोटो शेअर केला की, काही लोक पांडा, गेंडी, आज पांडा क्यूट दिसत आहे, अशाप्रकारच्या कमेंट करतात. मी खरे सांगते की, अशा लोकांचा आणि त्यांच्या कमेंटचा फरक मला अजिबात पडत नाही. हेच नाही तर मी त्यांच्या कमेंटचा विचारही करत नाही. यावरून त्या लोकांचे विचार कळतात.
कारण हे लोक लोखंडवालापर्यंत जाऊ शकत नाहीत आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो. हे लोक आपल्या आयुष्यात काहीच करू शकत नाहीत म्हणून ते कमेंटच्या माध्यमातून आपली भडास काढत असतात. आता भारत सिंह हिच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. लोकांना भारती सिंहचे बोलणे आवडले आहे.
भारती सिंह हिच्यावर काही दिवसांपूर्वीच कोकिलाबेन रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आलीये. त्यावेळी भारती सिंह हिने एक व्हिडीओ शेअर करत आपल्याला मुलाची आठवण येत असल्याचे म्हटले होते. गाॅल ब्लेडरमध्ये स्टोनची समस्या भारती सिंहला झाली होती आणि त्यानंतर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.