Gadar 2 चं प्रमोशन करण्यासाठी सीमा हैदर आली भारतात? नक्की काय आहे सत्य

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि 'गदर २' सिनेमाचं काय आहे कनेक्शन? सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ चर्चेत... सर्वत्र सीमा, 'गरद २' सिनेमाची चर्चा...

Gadar 2 चं प्रमोशन करण्यासाठी सीमा हैदर आली भारतात? नक्की काय आहे सत्य
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 4:06 PM

मुंबई | 28 जुलै 2023 : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या प्रेम प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नेपाळ येथून भारतात घुसखोरी करणारी सीमा हैदर आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. हेरगिरीच्या आरोपांनी वेढलेल्या पाकिस्तानी सीमा हैदर हिला आता भारताचं नागरिकत्व हवं आहे. यासाठी सीमा हिने याचिका देखील दाखल केली आहे. पण सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात अभिनेते सनी देओल याच्या ‘गदर २’ सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आली आहे… असं वक्तव्य विनोदी अंदाजात विनोदवीर आणि अभिनेता सुनील पाल याने केलं आहे. सध्या सर्वत्र सुनील पाल याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विनोदवीर आणि अभिनेता सुनील पाल इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सुनील पाकिस्तानी सीमा हैदर हिच्याबद्दल मोठं वक्तव्य करताना दिसत आहे. ‘सीमा हैदर हिचं भारतात येण्याचं कारण समोर आलं आहे. सनी देओल यांच्या गदर २ सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सीमा भारतात आली आहे.’ असं विनोदवीर म्हणाला.

हे सुद्धा वाचा

पुढे सुनील पाल म्हणाला, ‘सीमाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती सनी देओल यांची मोठी चाहती आहे. सनी यांच्यासोबत तिला सिनेमात काम करायचं आहे. म्हणून मला असं वाटतं सीमा गदर २ सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात आली आहे. सनी देओल यांचा बॉर्डर सिनेमा पाहिल्यानंतर सीमा अभिनेत्याची चाहती झाली आहे…’ सध्या सर्वत्र सुनील पाल याच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.

‘गदर २’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) स्टारर ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता तर सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील ११ ऑगस्टच्या प्रतीक्षेत आहेत.

सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाबद्दलची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कमाई केली. आता ‘गदर २’ सिनेमची चर्चा जोर धरत आहे. २२ वर्षांनंतर सकिना – तारा सिंग यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. ‘गदर २’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.