Vishakha Subhedar: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नव्या सिझनसह प्रेक्षकांच्या भेटीला; मात्र विशाखा सुभेदार होणार नाही सहभागी

या नव्या सिझनमध्ये समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओमकार भोजने, गौरव मोरे हे सहभागी होतील. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा- चार वार हास्याचा चौकार' असं या नव्या सिझनचं नाव आहे.

Vishakha Subhedar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नव्या सिझनसह प्रेक्षकांच्या भेटीला; मात्र विशाखा सुभेदार होणार नाही सहभागी
Vishakha SubhedarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 1:08 PM

मराठी टेलिव्हिजनच्या सर्वोत्कृष्ट कॉमेडी स्टार्सपैकी (Comedy Star) एक म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारने (Vishakha Subhedar) ‘महाराष्ट्राची हास्याजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra) या रिॲलिटी शोद्वारे प्रसिद्धी मिळवली. विशाखाने तिच्या दमदार अभिनय कौशल्याने गेल्या 4 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता महाराष्ट्राची हास्याजत्रा या कार्यक्रमाचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या नव्या सिझनमध्ये कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार दिसणार नाही. फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा यांसारख्या शोजमधून तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. एप्रिल महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने हास्यजत्रेचा निरोप घेत असल्याचं जाहीर केलं होतं. ‘दरवेळेस स्किट झाल्यावर किंवा होण्याआधीच टेंशन भयानक असत. कालच्यापेक्षा चांगलं करायचं, त्या टेन्शनमधून काहीकाळ बाहेर पडतेय. एक छान, उत्तम रंगवता येईल अशी भूमिका, मग ती फिल्म मधली 20/25 दिवसांच्या प्रवासाची किंवा नाटक 500 ते 1000 प्रयोगाची, किंवा मग सिरीयल मधली असो, मला या वाटेवरचा प्रवास सुरु करायचा आहे,’ असं म्हणत तिने हास्यजत्रेचा प्रवास थांबवला होता.

“होय, महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या नव्या सिझनमध्ये विशाखा सुभेदार सहभागी होणार नाही. विशाखाने हा शो सोडला असून प्रेक्षकांना तिची खूप आठवण येईल. नव्या सिझनमध्ये इतर बरेच कॉमेडियन्स असतील, जे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतील. येत्या 15 ऑगस्टपासून हा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येईल”, अशी माहिती शोच्या सूत्रांनी ई टाइम्सशी बोलताना दिली. हास्यजत्रा सोडल्यानंतर विशाखा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत भूमिका साकारताना दिसतेय.

हे सुद्धा वाचा

या नव्या सिझनमध्ये समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओमकार भोजने, गौरव मोरे हे सहभागी होतील. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा- चार वार हास्याचा चौकार’ असं या नव्या सिझनचं नाव आहे.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.