कंगना रनौतवर आक्षेपार्ह पोस्ट, राजकारण तापलं, काँग्रेस महिला नेत्या म्हणाल्या, ‘महिलांबद्दल वैयक्तिक टिप्पणी…’

Kangana Ranaut | 'वेश्याव्यवसाय करणाऱ्या…', कंगनाच्या 'त्या' फोटोवरून राजकारण तापलं, पोस्टवर काँग्रेस महिला नेत्यांनी मांडली स्वतःची भूमिका... कंगनाची अश्लील पोस्ट केल्याने काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट वादाच्या भोवऱ्या... सध्या सर्वत्र कंगनावर केलेल्या अश्लील पोस्टची चर्चा...

कंगना रनौतवर आक्षेपार्ह पोस्ट, राजकारण तापलं, काँग्रेस महिला नेत्या म्हणाल्या, 'महिलांबद्दल वैयक्तिक टिप्पणी...'
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 8:29 AM

अभिनेत्री कंगना रनौत हिच्या आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे राजकारणातील वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या महिला नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून कंगनाचा एका अश्लील फोटो पोस्ट करण्यात आला होता. यावर सुप्रिया श्रीनेत यांनी व्हिडीओ पोस्ट करत स्वतःची भूमिका मांडली आहे. सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या, ‘मी सर्व शक्तीनिशी विचारधारेची लढाई लढत आहे. पण मी कधी कोणत्या महिलेच्या विरोधात वैयक्तिक टिप्पणी करु शकत नाही. अशा प्रवृत्तीचा मी विरोध करते.’

‘जी लोकं मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मी असं कधीही करणार नाही. दुसऱ्या अकाउंटवरून हे कृत्य करण्यात आलं आहे. असं करणाऱ्याच्या शोधात मी आहे. माझ्या नावाचा गैरवापर करून तयार करण्यात आलेल्या पॅरोडी अकाउंटची तक्रार एक्स (ट्विटर) कडे केली आहे.’ असं देखील सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, कंगना रनौत हिच्यावर केलेली आक्षेपार्ह पोस्ट सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर सुप्रिया श्रीनेत यांच्याकडून ती पोस्ट डिलिट देखील करण्यात आली. पण यावर अभिनेत्रीने सुप्रिया श्रीनेत यांना सडेतोड उत्तर दिलं. कंगना म्हणाली, ‘कलाकार म्हणून माझ्या 20 च्या करियरमध्ये मी अनेक महिलांच्या भूमिका साकरल्या आहेत. आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहाच्या बंधनातून मुक्त केले पाहिजे. प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र आहे.’

पुढे कंगना म्हणाली, ‘क्वीन मध्ये एका साध्या मुलीपासून धाकड सिनेमात एक गुप्तहेर… मणिकर्णिका सिनेमात देवी पासून ‘चंद्रमुखी’ सिमेतील राक्षसापर्यंत… ‘रज्जो’ सिनेमात एका वेश्या पासून ते ‘थलायवी’ सिनेमात एक क्रांतिकारी नेता पर्यंत… मी प्रत्येक भूमिका साकारली आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचा अशाप्रकारे अपमान करणं थांबवलं पाहिजे.’ असं सडेतोड उत्तर कंगनाने सुप्रिया श्रीनेत यांना दिलं.

एनसीडब्ल्यू निवडणूक आयोगाला लिहिणार पत्र

एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणल्या, याप्रकरणी निवडणूक आयोगशी संपर्क करणार आहेत. रेखा शर्मा एक्सवर म्हणाल्या, ‘कंगना तू एक योद्धा आणि शायनिंग स्टार आहेस. ज्यांना असुरक्षित वाटतं तेच लोकं अशा वाईट गोष्टी करतात. माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. तजिंदर बग्गा निवडणूक आयोगाला पत्र लिहित आहेत.’ सध्या सर्वत्र कंगनावर करण्यात आलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.