Coolie No. 1 |’कुली नंबर. 1′ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरच चर्चेत!

वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) चा आगामी ‘कुली नंबर 1’ (Coolie No. 1) चित्रपट ख्रिसमसला अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.

Coolie No. 1 |'कुली नंबर. 1' चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरच चर्चेत!
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 5:05 PM

मुंबई : वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) चा आगामी ‘कुली नंबर 1’ (Coolie No. 1) चित्रपट ख्रिसमसला अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस अगोदरच वाद निर्माण झाला आहे. नाशिक येथील चित्रपटगृहात बेकायदा चित्रपट प्रदर्शित होत असल्याची बातमी आहे. जूमच्या रिपोर्टनुसार नाशिक येथील साई समर्थ टॉकीजने कुली नंबर 1 चित्रपट चुकीच्या पद्धतीने डाऊनलोड करुन चित्रपटगृहामध्ये स्क्रिनिंग करण्याची योजना आहे. (Coolie no. 1 ‘in the discussion before the film’s release)

भाजप चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष आणि फिल्म ट्रेड युनियनचे विजय सरोज यांनी बेकायदेशीरपणे चित्रपट प्रदर्शित करत असल्याचा आरोप केला आहे. साई समर्थ टॉकीजमध्ये कुली नंबर 1 चे पोस्टर्सही लावण्यात आले असल्याचे म्हटले आहे तसेत शहरात इतरत्र पोस्टर लावण्यात आले आहेत. विजय सरोज यांनी यासंदर्भात पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद देखील दिली आहे. कॉपी राईट अ‍ॅक्ट 1957 चे उल्लंघन केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे डिजिटल प्रदर्शन डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘Coolie No 1’ हा चित्रपट 25 डिसेंबरला अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आणि वरुण धवन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. हा चित्रपट 1 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.

तेव्हापासून देशभरातील चित्रपटगृह बंद होती. चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी अनेक महिने वाट पाहिली, परंतु कोरोनाची परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. त्यामुळे अखेर निर्मात्यांनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटात वरुण आणि सारासह परेश रावल, जावेद जाफरी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘कुली नंबर 1’ हा चित्रपट डेव्हिड धवन यांच्याच 1995 साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर वन’ चित्रपटाचा रिमेक आहे. जुन्या चित्रपटात अभिनेता गोविंदा, अभिनेत्री करिष्मा कपूर, कंचन, कादर खान, शक्ती कपूर आणि हरीश कुमारसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

संबंधित बातम्या :

Kangana Ranaut | ट्रोलर्सला कंगनाचे जोरदार प्रत्युत्तर, धर्माच्या मार्गाने चला, धर्माचे ठेकेदार बनू नका!

कोरोना नसता, तर आतापर्यंत आलियाशी लग्न झालं असतं : रणबीर कपूर

(Coolie no. 1 ‘in the discussion before the film’s release)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.