Aishwarya Rai | ऐश्वर्याच्या लग्नातील पोशाखाची किंमत तब्बल इतके लाख रुपये? कॉस्च्युम डिझायनरने केला खुलासा
ऐश्वर्या दक्षिण भारतीय असल्याने तिला तिच्या लग्नाच्या पोशाखात तिथली संस्कृती झळकावी, अशी इच्छा होती. आम्ही खास तिच्या लग्नासाठी कांजीवरम साडी विणून घेतली होती. त्या साडीवरील ब्लाऊजसुद्धा दक्षिण भारतीयांच्या पोशाखाप्रमाणे साधा होता.
मुंबई | 27 जुलै 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये वधूची वेशभूषा केली आहे. परंतु जेव्हा तिच्या स्वत:च्या लग्नाच्या पोशाखाचा प्रश्न होता, तेव्हा नेमके कोणते कपडे परिधान करायचे याबाबत ती पूर्णपणे स्पष्ट होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कॉस्च्युम डिझायनर नीता लुल्ला यांनी जवळपास दहा वर्षांपूर्वी ऐश्वर्यासोबत झालेल्या संभाषणाचा खुलासा केला. त्यावेळी ऐश्वर्या तिच्या लग्नासाठी पोशाख ठरवत होती. आपली संस्कृती आपल्या लग्नाच्या पोशाखातून झळकावी, अशी तिची इच्छा होती. ऐश्वर्याच्या लग्नाच्या कपड्यांबद्दल त्यावेळी खूप चर्चा होती. त्याची किंमत जवळपास 75 लाख रुपये असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यावर आता नीता लुल्ला यांनी उत्तर दिलं आहे.
ऐश्वर्याच्या लग्नाचा पोशाख 75 लाख रुपयांचा असल्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळलं. त्या पोशाखाची किंमत नेमकी आठवत नसली तरी ती अफवेच्या रकमेच्या (75 लाख रुपये) जवळपासही नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “ऐश्वर्याने जोधा अकबर या चित्रपटाच्या सेटवर वधूचा पेहराव केला होता. त्यावेळी तिने तिच्या लग्नाच्या पोशाखाबद्दल चर्चा केली होती. मला कांजीवरम साडी नेसायची आहे, असं ती म्हणाली होती. माझ्या आईसोबत याविषयी बोला आणि तुम्हाला ती साडी कुठून कशी मिळेला याची माहिती घ्या, असं तिने मला सांगितलं होतं.”
View this post on Instagram
ऐश्वर्या दक्षिण भारतीय असल्याने तिला तिच्या लग्नाच्या पोशाखात तिथली संस्कृती झळकावी, अशी इच्छा होती. आम्ही खास तिच्या लग्नासाठी कांजीवरम साडी विणून घेतली होती. त्या साडीवरील ब्लाऊजसुद्धा दक्षिण भारतीयांच्या पोशाखाप्रमाणे साधा होता. ऐश्वर्या ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘देवदास’ या चित्रपटांमध्येही वधूच्या पोशाखात दिसली होती. या दोन्ही चित्रपटांमध्ये तिचे पोशाख नीता लुल्ला यांनी डिझाइन केले होते.
ऐश्वर्याचा ‘पोन्नियिन सेल्वन 2’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटात ऐश्वर्याने दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. पीएस- 1 या चित्रपटाने जगभरात 500 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. तमिळनाडूमध्ये हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. कमल हासन यांच्या ‘विक्रम’ या चित्रपटाचा रेकॉर्ड पीएस-1 ने मोडला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने ऐश्वर्या रायने जवळपास दशकभरानंतर तमिळ सिनेसृष्टीत पुनरागमन केलं.