फसवणूक प्रकरणात विक्रम गोखलेंना दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन फेटाळला

जमीन विक्री प्रकल्पात फसवणूक (Cheating Case) केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यावर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी (29 सप्टेंबर) फेटाळून लावला.

फसवणूक प्रकरणात विक्रम गोखलेंना दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन फेटाळला
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 7:16 PM

पुणे : जमीन विक्री प्रकल्पात फसवणूक (Cheating Case) केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यावर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी (29 सप्टेंबर) फेटाळून लावला. या प्रकरणात विक्रम गोखलेंसह जयंत म्हाळगी आणि सुजाता म्हाळगी या दोघांविरूद्ध यावर्षी मार्च महिन्यात शहरातील पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Court denies pre arrest bail to actor Vikram Gokhale in Pune cheating case)

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्याचा सखोल तपास आवश्यक असल्याचे कारण देत, अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी देशपांडे यांनी गोखले यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून लावली असल्याचे, वकील पुष्कर सप्रे यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

पुण्यात मुळशी तालुक्यातील डोंगरगाव मधील जमिनीची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा विक्री करुन 14 जणांची फसवणूक केल्याचा गोखलेंवर (Vikram Gokhale) आरोप लावण्यात आला आहे. विक्रम गोखले यांच्यासह तिघांनी 96 लाख 99 हजार रुपयांना फसवणूक (Cheating Case) केल्याची तक्रार जयंत प्रभाकर बहिरट यांनी दिली होती.

जयंत म्हाळगी आणि सुजाता म्हाळगी यांनी 25 वर्षांपूर्वी सुजाता फार्म प्रा. लिमिटेड स्थापन करुन ‘गिरीवन प्रोजेक्ट’ कंपनीची स्थापना केली होती. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे ‘गिरीवन प्रोजेक्ट’चे अध्यक्ष आहेत. हा प्रोजेक्ट सरकारमान्य असल्याचा दावा करुन त्यांनी खोटी प्रलोभने देऊन प्लॉटधारकांना आकर्षित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Court denies pre arrest bail to actor Vikram Gokhale in Pune cheating case)

विना हरकत मोजण्या करुन घेण्याचा आदेश असताना संचालक वेळोवेळी हरकत घेत होते. प्लॉटधारकांनी मोजणी करुन घेतल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तसेच, गिरीवन प्रोजेक्ट हा प्रायव्हेट हिल स्टेशन असल्याचं सांगून फसवल्याचा (cheating Case) दावाही फिर्यादीनी केला आहे.

पैसे देऊनही जमिनींचा ताबा नाही

तक्रारदार असलेल्या 14 जणांना जाणूनबुजून चुकीच्या गटात खरेदीखत देणे, खरेदीखतात दिलेल्या गटापेक्षा जवळ जवळ दीड किमी लांब पझेशन देणे, खरेदी खतात दिलेला गट आणि पझेशन दिलेला गट सारखा नसणे, काहींना आजपर्यंत पझेशन घेऊ न देणे, पैसे घेऊन खरेदीखताप्रमाणे क्षेत्र न देणे, खरेदी केलेल्या प्लॉटवर जाऊ न देणे, अशा विविध प्रकारे या प्लॉटधारकांची फसवणूक केली आहे.

प्लॉटधारकांची एकूण 96 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) झाली असल्याचा दावा केला होता. या सर्वांवर 420, 465, 468, 341, 447, 427, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(Court denies pre arrest bail to actor Vikram Gokhale in Pune cheating case)

संबंधित बातम्या : 

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा

आधी 60 वर्षापुढील राजकारण्यांनी राजीनामे द्यावे, विक्रम गोखले भडकले

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.