सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युट्यूबरला कोर्टाकडून दिलासा, कारण…
Salman Khan: सलमान खान याच्या जीवाला धोका, पण अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या यूट्यूबरला कोर्टाकडून दिलासा, मोठं कारण आलं समोर..., गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला सतत येत आहेत धमक्या... गोळीबारानंतर चर्चांना उधाण...
बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युट्यूबरला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. सोमवारी मुंबईच्या एस्प्लेनेड मॅजिस्ट्रेट कोर्टाने युट्यूबरला जामीन मंजूर केल्याची माहिती समोर येत आहे. सांगायचं झालं तर, सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संबंध असल्याचा दावा करणाऱ्या गुन्हेगाराला मुंबई गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात अटक केली होती…. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.
सलमान खान याला धमकी देणाऱ्या युट्यूबर विरोधात धमकी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिश्नोई गँगशी संबध असल्याचा दावा करणाऱ्या युट्यूबरला पोलिसांनी 12 जून रोजी अटक केली होती. युट्यूबर राजस्थान येथील असून त्याचं नाव बनवारीलाल लातुरलाल गुजर असं आहे.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर बनवारीलाल आणि बिश्नोई गँगचा कोणताच संबंध नसल्याचं तपासातून समोर आलं आहे. फक्त लोकांचं लक्ष वेधण्यासाठी बनवारीलाल याने मोठं पाऊल उचललं होतं. वकील फैझ मर्चंट यांच्यामार्फत दाखल केलेल्या जामीन याचिकेत मोठा दावा करण्यात आला आहे.
कोणताच ठोस पुरावा नसताना युट्यूबरला गोवण्यात आलं आहे. फक्त मनोरंजन आणि प्रसिद्धीच्या उद्देशाने व्हिडीओ तयार करण्यात आला होता… असं देखील याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युट्यूबरची चर्चा रंगली आहे.