तुनिशा आत्महत्या प्रकरणात बॉयफ्रेंडला दिलासा नाही; न्यायालयाकडून मोठा निर्णय
तुनिशा आत्महत्या प्रकरणात शिझान खानच्या अडचणीत वाढ; आजही अभिनेत्याला दिलासा नाहीच...
Tunisha Sharma : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने वयाच्या २० व्या वर्षी आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिझान खानच्या जामिन अर्जावर आज सुनावणी झाली. पण आजही अभिनेत्याला दिलासा मिळालेला नाही. आता शिझानच्या जामिन अर्जावर ९ जानेवारी म्हणजे सोमवारी सुनावणी होणार आहे.
तुनिशाने २४ डिसेंबर २०२२ रोजी बॉयफ्रेंडच्या मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. बॉयफ्रेंडच्या मेकअप रुममध्ये तुनिशाने जीवन संपवल्यामुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर शिझान खानला पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून अभिनेत्याच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सोमवारी अभिनेत्याला दिलासा मिळेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय म्हणाले शिझानचे वकील
‘सत्य आणि न्यायाचा विजय होणार. आम्हाला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. मी पुन्हा म्हणतो मला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. शिझान खान निर्दोश आहे आणि पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे शिझान आणि त्याचं पूर्ण कुटुंब अडचणीत आहे.’ असं शिझानचे वकिल म्हणाले.
दरम्यान, पोलिस कोठडीत असलेल्या शिझानच्या वकिलांनी न्यायालयाकडे शिझानच्या वतीने काही मागण्या केल्या. ज्या मागण्या न्यायालयाने पूर्ण केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शिझानच्या वकिलांनी न्यायालयाकडे अभिनेत्याचे केस न कापण्याची विनंती केली होती. याशिवाय, शिझानला तुरुंगात सुरक्षा आणि वैद्यकीय समुपदेशनाची मागणी करण्यात आली होती. या मागण्या न्यायालयाने पूर्ण केल्या आहेत
तुनिशाच्या आईने अभिनेत्याने गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे अभिनेत्याच्या अडचणीत वाढ होत आहे. तुनिशाच्या आईने शिझानवर आरोप केल्यानंतर शिझानच्या वकिलांनी देखील अभिनेत्रीच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत.
शिझानच्या वकिलांनी तुनिशाच्या आईवर केले गंभीर आरोप पत्रकार परिषदेत शिझानचे वकील म्हणाले, ‘तुनिशाच्या आईने तिचा गळा दाबला होता. तुनिशा ज्या मालिकेमध्ये काम करत होती, त्या मालिकेच्या दिग्दर्शकांना देखील अभिनेत्रीने हा प्रकार सांगितला होता.’ एवढंच नाही, तर तुनिशाला तिने मेहनतीने कमावलेले पैसे देखील आईकडून सतत मागावे लागत होते… असं देखील शिझानचे वकील पत्रकार परिषदेत म्हणाले.