Marathi News Entertainment Crash diet for weight loss side effects sridevi was on a salt free diet She would often starve herself
Sridevi | क्रॅश डाएट ठरला श्रीदेवी यांच्यासाठी घातक? तुम्हीसुद्धा व्हा सावध!
लग्नानंतर बोनी कपूर यांना श्रीदेवी यांच्या कठीण डाएटविषयी माहिती होती. अनेकदा डिनर करतानाही त्या मिठाशिवाय जेवण जेवायच्या. हे पाहून बोनी कपूर यांनी डॉक्टरांकडेही विनंती केली होती. श्रीदेवी यांना जेवणात थोडंफार प्रमाणात मीठ खाण्याचा सल्ला द्या, असं ते डॉक्टरांना सांगायचे.
1 / 6
फेब्रुवारी 2018 मध्ये अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. श्रीदेवी यांच्या निधनाच्या पाच वर्षांनंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पती आणि निर्माते बोनी कपूर यांनी बरेच खुलासे केले आहेत.
2 / 6
बोनी कपूर यांनी सांगितलं की, लग्न झाल्यापासूनच श्रीदेवी क्रॅश डाएट फॉलो करत होत्या. मात्र या डाएटमुळे अनेकदा त्यांना चक्करसुद्धा यायची. मीठ शरीरातील पाण्याला रोखून ठेवतं. मात्र स्लिम दिसण्यासाठी शरीरातील पाणी रोखून ठेवता येऊ नये यासाठी क्रॅश डाएटचा पर्याय अवलंबला जातो. या क्रॅश डाएटमध्ये मिठाशिवाय अन्नाचं सेवन केलं जातं.
3 / 6
शरीरात मिठाचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेकदा त्यांना कमी रक्तदाबाचाही त्रास व्हायचा. यामुळेच त्यांना शूटिंगदरम्यानही चक्कर यायचे. बोनी कपूर यांच्या मुलाखतीनंतर क्रॅश डाएट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न अनेकांना पडला. तर त्याविषयी जाणून घेऊयात..
4 / 6
क्रॅश डाएट ही जलद गतीने वजन कमी करण्याची एक डायटिंग प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये सर्वात कमी कॅलरीचं डाएट फॉलो केलं जातं. म्हणजेच जर एखादी सर्वसामान्य व्यक्ती 2000 ते अडीच हजार कॅलरी खात असेल. तर क्रॅश डाएटमध्ये कॅलरीचं हे प्रमाण 800 ते 1000 केलं जातं.
5 / 6
क्रॅश डाएट विविध प्रकारचे असतात. ज्यामध्ये वेगवेगळ्या अन्नाला प्राधान्य दिलं जातं. मास्टर क्लीन्जमध्ये विटामिन सीने परिपूर्ण असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. तर ज्यूस क्लीन्ज डाएटमध्ये फक्त फळांचं रस सेवन केलं जातं. मात्र क्रॅश डाएट करून कमी केलेलं वजन पुन्हा कधीही वाढू शकतं. हे डाएट बंद केल्यानंतर लगेचच पुन्हा वजन वाढू शकतं.
6 / 6
अनेकदा क्रॅश डाएटमुळे पोषक तत्त्व, विटामिन्स आणि मिनरल्सचीही कमतरता शरीरात होऊ शकते. जर शरीरातील आवश्यक विटामिन्स आणि मिनरल्सची कमतरता निर्माण झाली तर साहजिकच त्या व्यक्तीला थकवा आणि कमजोरी जाणवू लागते.