विराट कोहली याने केला अनुष्का शर्मा हिच्याबद्दल ‘तो’ खुलासा, म्हणाला, ती भारतासाठी…
बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा हे सध्या चांगलेच चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अनुष्का शर्मा दिसत आहे. कुटुंबासोबत खास वेळ घालवताना अनुष्का सध्या दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही 2018 पासून तशी अभिनयापासून दूर आहे. मात्र, असे असतानाही अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा हिने एक अत्यंत खास असा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा लेक अकाय याचा हात दिसत होता. मुलगा अकाय याला काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा हिने लंडनमध्ये जन्म दिला. हेच नाही तर मुलाच्या जन्मानंतर विदेशातच अनुष्का शर्मा आहे. काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा विदेशातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. त्या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा हिच्याकडे अकाय देखील दिसत आहे.
विराट कोहली हा कायमच विदेशात स्थायिक होणार असल्याचे सातत्याने सांगितले जाते. खरोखरच विराट कोहली आणि अनुष्का कायमचे लंडनला स्थायिक होणार का? हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. विराट कोहली याची एक मुलाखत चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. या मुलाखतीमध्ये विराट हा अनुष्का शर्मा हिच्याबद्दल खुलासे करताना दिसतोय.
विराट कोहली म्हणाला की, अनुष्का शर्माला क्रिकेटबद्दल काहीच देणे घेणे नाहीये. तिला फक्त माझ्यासोबत वेळ घालवायचा असल्याने ती येते. तिची कायमच एकच प्रार्थना असते की, फक्त भारत जिंकावा. तुम्ही पाहा की, ज्यावेळी टेस्ट मॅच असतो त्यावेळी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत अनुष्का ही फॅमिली बॉक्समध्ये एकटीच बसलेली असते. तिला टेस्ट मॅच बघायला खूप जास्त आवडते.
पुढे विराट कोहलीला विचारण्यात आले की, त्यावेळी तू मैदानात बॅटिंग करतो त्यावेळी अनुष्का शर्माला टेन्शन असते? आता नाही अगोदर ती टेन्शन घेत. विराट म्हणाला, ज्यावेळी मी चांगले खेळत नाही, त्यावेळीही ती टीमला सपोर्ट करण्यासाठी फॅमिली बॉक्समध्ये बसलेली असते आणि भारत जिंकण्यासाठी प्रार्थना करते. पण लोकांना या गोष्टी समजावणे खूप जास्त कठीण आहे.
हातामध्ये बॅनर घेऊन लोकांना हे तर सांगू शकत नाही ना की, मी भारताला सपोर्ट करण्यासाठी इथे आले. फक्त विराटला खेळताना बघण्यासाठी नाही. भारताची टीम जेंव्हा चांगले खेळते तेंव्हा अनुष्काला खूप जास्त अभिमान वाटतो. विराट कोहली हा कायमच अनुष्का शर्मा हिला सपोर्ट करताना दिसतो. सध्या विराट आणि अनुष्का आपल्या मुला आणि मुलीसोबत लंडनमध्ये चांगला वेळ घालवताना दिसत आहेत.