संजूबाबाने 45 दिवसांत कमावले 15 कोटी, आता त्याच व्यवसायात युवराजने मारली उडी
असा कोणत्या व्यवसाय आहे, जो सेलिब्रिटींना एका महिन्यात कोट्यवधी रुपये कमावून देतो, संजूबाबानंतर क्रिकेटपटू युवराजने मारली 'त्या' व्यवसायात उडी..., बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान देखील व्यवसायात सक्रिय

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर कायम वेगवेगळ्या व्यवसायांमधून अधिक पैसे कमावण्याचे मार्ग शोधत असतात. अभिनय आणि खेळासोबतच सेलिब्रिटी अनेक व्यवसाय देखील करत असतात. अनेक सेलिब्रिटींचे क्लोथिंग ब्रँड आहेत. तर काहींचे आलिशान हॉटेल आहेत. एवढंच नाही तर, रियल इस्टेटमधून देखील सेलिब्रिटी पैसे कमावतात. अभिनेता संजय दत्त देखील अभिनयासोबतच व्यवसायातून गडगंज पैसे कमावतो. संजूबाबाचा असा एक व्यवसाय आहे, ज्या माध्यमातून अभिनेता कोट्यवधींची कमाई करतो…
संजय दत्त याच्या व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर, दारु व्यवस्यात अभिनेता सक्रिय आहे. संजूबाबाचा स्वतःचा एका ब्रँड आहे. त्याच्या ब्रँडचं नाव द ग्लेनवॉक (The Glenwalk) असं आहे. 2024 मध्ये अभिनेत्याने ब्रँड लॉन्च केला आणि 45 दिवसांमध्ये 15 कोटी रुपये कमावले. अभिनेता कायम सोशल मीडियावर स्वतःच्या व्हिस्की ब्रँडचं प्रमोशन करत असतो.
संजूबाबाच्या ब्रँडच्या 200 एमएल 3 लाखांपेक्षा जास्त बाटल्यांची विक्री झाली आहे. 500 रुपयांना विकल्या जाणाऱ्या या बाटल्यांमधून संजूबाबाने दीड महिन्यात 15 कोटींहून अधिक कमाई केली आहे. महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या या व्हिस्की ब्रँडच्या जोरावर संजय दत्तच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होत आहे.




संजूबाबासोबतच अनेक सेलिब्रिटी दारुच्या व्यवसायात आहेत. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान देखील दारु व्यवसायात सक्रिय आहे. त्याचा देखील स्वतः ब्रँड आहे. आता या व्यवसायात क्रिकेटपटू युवराज सिंग याची देखील एन्ट्री झाली आहे.
युवराज सिंगने त्याचा नवा लक्झरी टकीला ब्रँड लॉन्च केला आहे. त्याने अल्ट्रा-प्रिमियम कॅटेगरीसाठी टकीला लॉन्च केला आहे. सध्या हा ब्रँड अमेरिकन मार्केटमध्ये उपलब्ध आहे, पण लवकरच तो भारतातही लॉन्च केला जाईल. युवराजने अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित एका खास कार्यक्रमात त्याचा टकीला ब्रँड फिनो लॉन्च केला.
यावेळी युवराज म्हणाला, ‘FINO मध्ये ते सर्वकाही आहे, ज्यावर मी विश्वास ठेवतो. एप्रिल 2025 पर्यंत ब्रँड भारतीय बाजारातही लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे. युवराज सिंग त्याच्या अल्कोहोल ब्रँडबद्दल खूप उत्साहित दिसत होता. सध्या सर्वत्र युवराजच्या टकीला ब्रँडची चर्चा रंगली आहे.