satish kaushik याच्या मृत्यूला नवं वळण; पोलिसांनी फार्म हाऊसमधून जप्त केल्या धक्कादायक गोष्टी

मृत्यूपूर्वी ज्या फार्म हाऊसमध्ये सतीश कौशिक यांनी पार्टी केली, त्याच ठिकाणाहून पोलिसांच्या हाती लागल्या धक्कादायक गोष्टी... अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाला नवीन वळण

satish kaushik याच्या मृत्यूला नवं वळण; पोलिसांनी फार्म हाऊसमधून जप्त केल्या धक्कादायक गोष्टी
satish kaushik
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 10:56 AM

Satish Kaushik Daughter : दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कौशिक यांच्या निधनानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटींच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सतीश कौशिक यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं असल्यांच आलं. पण आता सतीश कौशिक यांच्या निधनाने वेगळं वळण घेतलं आहे. सध्या सर्वत्र सतीश कौशिक यांच्या निधनाची चर्चा आहे. सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी फार्म हाऊसमधून पोलिसांनी काही धक्कादायक गोष्टी जप्त केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी ज्या फार्म हाऊसमध्ये सतीश कौशिक यांनी होळीची पार्टी केली होती. त्याठिकाणाहून दिल्ली पोलिसांनी काही औषधं जप्त केली आहेत. यामध्ये सतीश यांचे नियमीत ओषधं होती. याशिवाय काही औषधं तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी कोणती गोष्ट समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांचं निधन संशयास्पद नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं नाही. कारण त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. अधिक तपासणीसाठी सतीश कौशिक यांचं रक्त आणि हृदय ठेवण्यात आलं आहे. जवळपास १५ दिवसांनंतर त्यांचे रक्त आणि हृदयाचे रिपोर्ट मिळणार आहेत.

हे सुद्धा वाचा

सतीश कौशिक यांचे रिपोर्ट मिळाल्यानंतर त्यांच्या निधनाचं खरं कारण समोर येईल असं देखील सांगण्यात येत आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का लागला आहे. सतीश कौशिक यांनी ज्याप्रकारे चाहत्यांच्या मनात घर केलं, त्याचप्रमाणे कौशिक त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील खास होते.

सतीश कौशिक निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्राद्धांजली वाहिली. तर अनेक सेलिब्रिटी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. सतीश कौशिक, पत्नी आणि लेक वंशिका कौशिक हिला सोडून गेले आहेत.

‘या’ सिनेमांच सतीश कौशिक यांनी केलं दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी 1993 मध्ये रूप की रानी चोरों का राजा’ या सिनेमातून दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘बधाई हो बधाई’ यांसारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. शिवाय कंगना रनौत हिच्या ‘इमरजेन्सी’ सिनेमाचं दिग्दर्शन देखील कौशिक यांनी केलं आहे. सिनेमा कौशिक यांच्या निधनानंतर प्रदर्शित होणार आहे. शिवाय ‘गन्स एन्ड गुलाब’ सतीश कौशिक यांचा शेवटचा वेब शो ठरणार आहे.

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.