सलमान खानला रोनाल्डोने केलं दुर्लक्ष; युजर्स म्हणाले ‘भाई का गुस्सा..’

अभिनेता सलमान खान आणि फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हे आपापल्या क्षेत्रात लोकप्रिय आणि कुशल आहेत. या दोघांचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. नुकतेच हे दोघं एकाच फ्रेममध्ये दिसले आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओतील एका गोष्टीमुळे सलमानचे चाहते नाराज झाले आहेत.

सलमान खानला रोनाल्डोने केलं दुर्लक्ष; युजर्स म्हणाले 'भाई का गुस्सा..'
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि सलमान खानImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 9:45 AM

मुंबई : 31 ऑक्टोबर 2023 | बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला दमदार प्रतिसाद मिळाला. यादरम्यान सलमान नुकताच सौदी अरबमध्ये टायसन फ्युरी आणि फ्रान्सिस नगनौ यांच्यातील बॉक्सिंगची मॅच पहायला पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत फुटबॉलविश्वातील जगप्रसिद्ध खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिग्जसुद्धा तिथे उपस्थित होती. जेव्हा एकाच फ्रेममध्ये सलमान आणि रोनाल्डो आले, तेव्हा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणं साहजिकच होतं. मात्र या सगळ्यात एक गोष्ट नेटकऱ्यांच्या निदर्शनास आली. ती म्हणजे सलमानला रोनाल्डोने केलेलं दुर्लक्ष.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये रोनाल्डो सलमानला ओळखतसुद्धा नसल्याचं दिसतंय. सलमान बाजूलाच असताना रोनाल्डो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे निघून जातो. हा व्हिडीओ समोर येताच त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. बॉक्सिंग मॅच संपताच रोनाल्डो त्याच्या गर्लफ्रेंडचा हात पकडून पुढे निघून जातो. तेव्हाच समोरून सलमान येतो. मात्र रोनाल्डो त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघून जातो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

सलमान खान आणि रोनाल्डोच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना अभिनेता कमाल आर. खानने लिहिलं, ‘तो जगप्रसिद्ध खेळाडू आहे. तो बॉलिवूडच्या छोट्या-मोठ्या अभिनेत्यांना ओळखत नाही.’ केआरकेची ही कमेंट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं, ‘सलमान खान आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो.. सर्वांत मोठा क्रॉसओव्हर.’ काहींनी त्यावर विनोदी कमेंट्ससुद्धा केले आहेत. ‘सलमान भाईचा राग आता बाहेर निघणार. तो रोनाल्डोचा बायोपिक बनवून त्याला फ्लॉप करेल’, असं नेटकऱ्यांनी लिहिलंय. ‘भाईजान आता रोनाल्डोचं करिअर संपवणार’, असंही काहींनी म्हटलंय.

सलमानच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ‘टायगर 3’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर येत्या 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सलमानसोबतच कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.