बिग बॉस अभिनेत्याचं ड्रग्स रॅकेट, धाड टाकून ऑफिसबॉयला अटक, कनेक्शन थेट परदेशातून
Bigg Boss Fame Actor: 35 लाखांचं एमडीएम ड्रग्स प्रकरण... दोन वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर देखील अभिनेत्याचं ड्रग्स रॅकेट छुप्या पद्धती सुरू, ऑफिसबॉयला अटक, कनेक्शन थेट परदेशातून
‘बिग बॉस’ सीझन 7 मधील अभिनेता एजाज खान तब्बल दोन वर्ष ड्रग्स प्रकरणात तुरुंगात होता. काही महिन्यांपूर्वीच तुरुंगातू सुटला होता. पण आता पुन्हा अभिनेत्याचं नाव ड्रग्स प्रकणात पुढे आलं आहे. ड्रग्स प्रकरणात कस्टम विभागाने एजाज खानच्या कार्यालयात धाड टाकून त्याच्या ऑफिसबॉयला अटक केली. 35 लाखांच्या एमडीएम ड्रग्स प्रकरणात कस्टम कडून सूरज गौडला करण्यात आली अटक.
सूरज गौड असं एजाज खानच्या ऑफिसबॉयचं नाव असून, तो अभिनेत्याच्या अंधेरीतील कार्यालयात काम करतो. युरोपियन देशातून तस्करी केलेले ड्रग्स एजाज खानच्या अंधेरीतील कार्यालयात पोहोचवण्यात आले होते. त्यावेळी कस्टमने ही कारवाई केली आहे.
ड्रग्स प्रकरणात अभिनेता 2 वर्ष होता तुरुंगात
ड्रग्स प्रकरणात अभिनेता 2 वर्ष तुरुंगवास भोगल्या नंतर एजाज खान याची सुटका झाली होती. पण आता पुन्हा अभिनेता ड्रग्स प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेत्याबद्दल सांगायचं झालं तर, एजाज याला अभिनेता सलमान खान याच्या ‘बिग बॉस’ शोमधून ओळख मिळाली. पण प्रसिद्धीझोतात आल्यानंतर एका गंभीर प्रकरणामुळे अभिनेत्याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली.
2021 मध्ये ड्रग्स प्रकरणात एजाज खान याला अटक करण्यात आली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) एजाजला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलं होतं. अभिनेत्याजवळ अल्प्राझोलम नावाच्या औषधांच्या 31 गोळ्या सापडल्या होत्या. त्यामुळे अभिनेत्यावर कारवाई करण्यात आली होती.
एजाज खान याच्याकडे सापडलेल्या गोळ्याचं वजन 4.5 ग्रॉम होतं.. त्यानंतर अभिनेत्याला पोलिसांनी विमानतळावरून अटक केलं. तब्बल दोन एजाज खान मुंबई येथील आर्थर रोड तुरुंगात कैद होता. एजाज खानवर एनसीबीने ड्रग्ज तस्कर शादाब बटाटा यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्याला अटकही करण्यात आली होती.
कधी झाली एजाज खान याची सुटका?
19 मे 2023 रोजी संध्याकाळी 6.40 वाजता एजाज खान याची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. तेव्हा अभिनेत्याला घरी नेण्यासाठी कुटुंबिय आले होते. अभिनेत्याच्या सुटकेसाठी कुटुंबियांनी दोन वर्ष अनेक प्रयत्न केले आणि त्याची सुटका केली. पण आता पुन्हा अभिनेता ड्रग्स प्रकरणार अडकला आहे.