‘या’ दिग्गज अभिनेत्रीला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

'या' दिग्गज अभिनेत्रीला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
Anurag ThakurImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 1:26 PM

मुंबई- कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार (Dada Saheb Phalke Award) हा अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली. आपल्या दमदार अभिनयाने 60 आणि 70 च्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. आशा पारेख यांनी त्यांच्या काळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. त्या 79 वर्षांच्या आहेत. 2 ऑक्टोबर 1942 रोजी गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला होता. गुजराती कुटुंबातून येणाऱ्या आशा यांच्या आई मुस्लिम आणि वडील गुजराती होते.

60-70 च्या दशकात आशा पारेख या केवळ चित्रपटांमुळेच नाही तर त्यांच्या मानधनामुळेही चर्चेत असायच्या. तेव्हाच्या काळात आशा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या.

हे सुद्धा वाचा

आशा यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली.

‘गूंज उठी शहनाई’ या चित्रपटासाठी निर्माते विजय भट्ट यांनी त्यांना रिजेक्ट केलं होतं. त्यानंतर आठ दिवसांनी निर्माते सुबोध मुखर्जी आणि नासिर हुसैन यांनी त्यांना एका मोठ्या चित्रपटाची ऑफर दिली. या चित्रपटाचं नाव होतं ‘दिल देके देखो’ आणि त्यात शम्मी कपूर मुख्य भूमिकेत होते. आशा पारेख यांच्या करिअरमधील हा सर्वोत्तम चित्रपट ठरला. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

आशा पारेख यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 80 चित्रपटांमध्ये काम केलं. ‘जब प्यार किसी से होता है’, ‘घराना’, ‘भरोसा’, ‘मेरे सनम’, ‘तिसरी मंजिल’, ‘उपकार’, ‘शिकार’, ‘साजन’, ‘आन मिलो सजना’ हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.