दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार सोहळ्यात ‘या’ वेब सीरिजचा बोलबाला; सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान कोणाचा?

दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार २०२३ सोहळा मोठ्या थाटात पार पडला.. पुरस्कार सोहळ्यात 'या' वेब सीरिजचा बोलबाला

दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार सोहळ्यात 'या' वेब सीरिजचा बोलबाला; सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान कोणाचा?
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 10:22 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे कलाकारांसाठी पुरस्कार सोहळ्याचं महत्त्व फार मोठं असतं. आपण केलेल्या कामाची पोचपावती कलाकारांना पुरस्काराच्या माध्यमातून मिळते. पुरस्कार सेलिब्रिटी आणि मनोरंजनाशी संबंधित लोकांचे धैर्य वाढवतात. त्यांना मनापासून काम करण्यासाठी आणखी उत्साहित करतात. नुकताच दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार २०२३ सोहळा मोठ्या थाटात पार पडला. पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार २०२३ सोहळ्यात वेब सीरिजचा बोलबाला पहायला मिळाला. दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार २०२३ सोहळ्यात ‘रॉकेट बॉईज’ या वेब सीरिजला सर्वोत्कृष्ट सीरिज म्हणून सन्मानित करण्यात आलं..

दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार २०२३ सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अर्शद वारसी याला सन्मानित करण्यात आलं. तर अभिनेत्री अहाना कुमरा हिला ‘इंडिया लॉकडाउन’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदाण करण्यात आला.. शिवाय अभिनेत्री शेफाली शाह हिला ‘डार्लिंग्स आणि ह्युमन’ या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकार म्हणून अभिनेत्री शांती प्रिया (धरावी बँक), अभिनेता अभिषेक बॅनर्जी आणि इश्वाक सिंग यांना सन्मानित करण्यात आलं. बॉलिवूड सिनेमांच्या विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अभिनते अनुपम खेर यांना प्रदाण करण्यात आला.

सिनेमा विभागात सर्वात प्रेरणादायी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री महिना चौधरी हिला दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार देण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक म्हणून नीना गुप्ता यांना पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार अभिमन्यू सिंग याला देण्यात आला…

गुजराती विभागात देखील दादासाहेब फाळके फिल्म पुरस्काराने कलाकारांना सन्मानित करण्यात आलं…

सर्वोत्कृष्ट सिनेमा – ‘फक्त महिलाओ माते’ सिनेमा

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – जय बोदास – ‘फक्त महिलाओ माते’ सिनेमा

सर्वोत्कृष्ट अभिनेता – यश सोनी, हितू कनोडिया, रौनक कामदार

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – जानकी बोडीवाला, दिक्षा जोशी

भोजपुरी विभागात देखील दादासाहेब फाळके फिल्म पुरस्काराने कलाकारांना सन्मानित करण्यात आलं…

सर्वोत्कृष्ट सिनेमा -‘आन बान शान’ सिनेमा

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – प्रमोद शास्त्री

सर्वोत्कृष्ट अभिनेता – रितेश पांडे

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – काजल यादव

टीव्ही विश्वातील कलाकारांना देखील दादासाहेब फाळके फिल्म पुरस्काराने कलाकारांना सन्मानित करण्यात आलं…

सर्वोत्कृष्ट मालिका – राजन शाही

सर्वोत्कृष्ट विनोदी मालिका – बिनेफर कोहली ‘भाभी जी घर पर हैं’

सर्वोत्कृष्ट अभिनेता – हर्षद चोप्रा

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – प्रणाली राठोड

सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार – सानंद वर्मा, सलीम झैदी

सर्वोत्कृष्ट खलनायक – मदालसा शर्मा

उभरता कलाकार – करणवीर शर्मा

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.