Shiv Thakare | सलमानच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला शिव ठाकरे करतोय डेट? अखेर तिनेच दिलं उत्तर

शिव ठाकरे आणि डेझी शाह हे 'खतरों के खिलाडी'च्या तेराव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले. त्यांच्यासोबत अर्जित तनेजा, अर्चना गौतम, ऐश्वर्या शर्मा, डिनो जेम्स, रश्मीत कौर, रुही चतुर्वेदी, अंजली आनंद, निरा बॅनर्जी, शिझान खान हे सेलिब्रिटीसुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.

Shiv Thakare | सलमानच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला शिव ठाकरे करतोय डेट? अखेर तिनेच दिलं उत्तर
Shiv Thakare
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 2:03 PM

मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : ‘बिग बॉस’ या शोमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता शिव ठाकरे सध्या ‘खतरों के खिलाडी 13’ या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये शिवचं नाव अभिनेत्री, डान्सर आणि कोरिओग्राफर डेझी शाहसोबत जोडलं जात आहे. ‘खतरों के खिलाडी’च्या सेटवर या दोघांमधील जवळीक अधिक वाढली आहे. त्यामुळे हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यावर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डेझीने मौन सोडलं आहे. डेझीने सुरुवातीला कोरिओग्राफर गणेश आचार्यसोबत असिस्टंट म्हणून काम केलं. 2011 मध्ये ‘भद्रा’ या कन्नड चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी तिची निवड झाली होती. त्यानंतर ती 2014 मध्ये सलमान खानसोबत ‘जय हो’ चित्रपटात झळकली.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत डेझी म्हणाली, “शिव ठाकरेसोबतच्या लिंकअपच्या अफवांमुळे आमच्यातील मैत्रीवर काहीच परिणाम होणार नाही. आम्ही या गोष्टींचा सामना आपापल्या पद्धतीने करतोय. जोपर्यंत आम्ही जाहीर करत नाही की एकमेकांना डेट करतोय, तोपर्यंत मीडिया, लोक किंवा चाहत्यांनी त्यावर शिक्कामोर्तब करून चर्चा करावी अशी माझी इच्छा नाही. सध्या तरी आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहोत.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

डेटिंगच्या चर्चांनंतर आमच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली आहे, असंही डेझीने स्पष्ट केलं. ती पुढे म्हणाली, “आता आम्ही आधीपेक्षाही चांगले मित्र झालो आहोत. आम्ही खासगी आयुष्य आमच्यापर्यंतच मर्यादित ठेवू इच्छितो. आम्हाला ते जगासमोर आणायचं नाही. तुम्ही तुमचं खासगी आयुष्य जितकं लोकांसमोर आणाल, तेवढं ते तुमच्याबद्दल चर्चा करू लागतील.”

शिव ठाकरे आणि डेझी शाह हे ‘खतरों के खिलाडी’च्या तेराव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले. त्यांच्यासोबत अर्जित तनेजा, अर्चना गौतम, ऐश्वर्या शर्मा, डिनो जेम्स, रश्मीत कौर, रुही चतुर्वेदी, अंजली आनंद, निरा बॅनर्जी, शिझान खान हे सेलिब्रिटीसुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.

‘खतरों के खिलाडी’ हा देशातील सर्वांत लोकप्रिय स्टंट-बेस्ड रिॲलिटी शो आहे. या शोचा तेरावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी या शोचं सूत्रसंचालन करतो. बिग बॉसनंतर या रिॲलिटी शोचा मोठा चाहतावर्ग आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.