अखेर दलजीत कौर हिच्या घटस्फोटावर होणार खुलासा, पतीसोबतच्या वादावर करणार भाष्य? अभिनेत्रीने..
अभिनेत्री दलजीत कौर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसतंय. दलजीत कौर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंद ही बघायला मिळतंय. मात्र, दलजीत कौर ही लवकरच पतीसोबत घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जातंय, यांच्या नात्यामधील तणाव वाढला असल्याचे सांगितले गेले.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. दलजीत कौर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दलजीत कौर हिने गेल्याच वर्षी बिझनेसमॅन निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले. भारतामध्येच अत्यंत शाही पद्धतीने लग्न करताना दलजीत कौर दिसली. दलजीत कौरच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. मात्र, दलजीत कौर हिच्या आयुष्यात परत एकदा मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर दलजीत कौर ही भारतात परतली आहे.
दलजीत कौर ही निखिल पटेल याच्यासोबतच्या लग्नानंतर विदेशात शिफ्ट झाली. मात्र, अचानक आपल्या मुलासोबत दलजीत कौर ही भारतात आली. दलजीत कौर हिचे निखिल पटेल याच्यासोबतचे हे दुसरे लग्न आहे. दलजीत कौर हिचे पहिले लग्न टीव्ही अभिनेता शालिन भनोट याच्यासोबत झाले होते. मात्र, यांचे लग्न फार काळ टिकले नाही.
दलजीत कौर आणि निखिल पटेल यांच्यामध्ये काहीतरी खटकले उडाल्याचे बघायला मिळतंय. भारतामध्ये परतल्यानंतर दलजीत कौर हिने निखिल पटेल याच्यासोबतचे सर्व फोटो हे सोशल मीडियावरून डिलीट केले. हेच नाही तर पटेल हे लावलेले आडनाव देखील सोशल मीडियावरून काढले. निखिल आणि दलजीत कौर यांच्या नात्यात तणाव असल्याचे सांगितले जातंय.
दलजीत कौर आणि निखिल पटेल हे घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. आता ही चर्चा सुरू असतानाच दलजीत कौर ही बिग बाॅस ओटीटी 3 मध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय. फक्त हेच नाही तर दलजीत कौर ही तिच्या आणि निखिलच्या नात्याबद्दल आणि वादाबद्दल देखील बिग बाॅस ओटीटीमध्ये खुलासे करू शकते असेही सांगितले जातंय.
विदेशातून भारतामध्ये परतल्यानंतर दलजीत कौर हिने आपल्याला परत एकदा मालिकांमध्ये काम करायचे असल्याचे सांगितले. म्हणजेच आता हे स्पष्ट आहे की, दलजीत कौर ही परत विदेशात जाणार नाहीये. मात्र, दलजीत कौर हिने आपल्या घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य करणे टाळलेच आहे. आता दलजीत कौर हिच्याकडून बिग बाॅसच्या घरात गेल्यानंतर काही मोठे खुलासे हे केले जाऊ शकतात.