घटस्फोट होणार? अगोदर काढले पतीचे आडनाव आणि थेट केले फोटो डिलीट, अभिनेत्रीने केला अखेर मोठा खुलासा
Dalljiet Kaur : अभिनेत्री दलजीत कौर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. दलजीत कौर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. दलजीत कौर ही नुकताच भारतामध्ये परतली आहे. दलजीत कौर हिने सोशल मीडियावरून पतीचे आडनाव काढले आणि थेट फोटोच डिलीट केले.

मुंबई : अभिनेत्री दलजीत कौर ही कायमच चर्चेत असते. दलजीत कौर हिने 18 मार्च 2023 रोजी दुसऱ्यांदा लग्न केले. निखिल जैन याच्यासोबत दलजीत कौर हिने लग्न केले. दलजीत कौर ही निखिल जैन याच्यासोबतच्या लग्नानंतर विदेशात शिफ्ट झालीये. विशेष म्हणजे दलजीत कौर हिला अगोदरच्या पतीचा एक मुलगा आहे आणि निखिल जैन याला देखील अगोदरच्या पत्नीच्या दोन मुली आहेत. हे सर्व केन्यामध्ये राहतात. दलजीत कौर आणि निखिल यांचे लग्न भारतामध्येच अत्यंत खास पद्धतीने पार पडले.
दलजीत कौर हिच्या लग्नाचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. नुकताच दलजीत कौर ही आपल्या मुलासोबत भारतामध्ये पोहचली. दलजीत कौर हिला अशाप्रकारे भारतामध्ये पाहून सर्वचजण हैराण झाले. हेच नाही तर दलजीत कौर हिच्या पर्सनल लाईफमध्ये काहीतरी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली.
हेच नाही तर दलजीत कौर हिने सोशल मीडियावरून पतीचे फोटो डिलीट करत पतीचे आडनाव देखील काढून टाकले. यानंतर चाहते हैराण झाले. सतत दलजीत कौर हिच्या घटस्फोटाच्या चर्चा या सुरू आहेत. आता शेवटी यावर भाष्य करताना दलजीत कौर ही दिसत आहे. दलजीत कौर हिने नुकताच एक मुलाखत देत मोठा खुलासा केला.
दलजीत कौर हिने म्हटले की, मी पतीसोबतचे फोटो सहजच डिलीट केले. मी भारतामध्ये माझ्या आई आणि वडिलांच्या सर्जरीसाठी आलीये. अशा गोष्टी कोट नका करू. तसेच दलजीत कौर हिने घटस्फोटाच्या चर्चांवर नकार दिला आहे. दलजीत कौर हिचे हे बोलणे ऐकून चाहत्यांमध्ये आनंद बघायला मिळतोय.
दलजीत कौर हिचे पहिले लग्न टीव्ही अभिनेता शालिन भनोट याच्यासोबत झाले. मात्र, यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. दलजीत कौर आणि शालिन भनोट यांचा एक मुलगा देखील आहे. दलजीत कौर हिने शालिन भनोट याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. यानंतर दलजीत कौर हिने शालिन भनोट याच्यासोबत घटस्फोट घेतला.