‘पूर्व पतीसोबत पॅचअप करून घे’ म्हणणाऱ्याला दलजीत कौरचं उत्तर; शालीनवर साधला निशाणा

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. दुसऱ्या पतीसोबत संघर्ष सुरू असतानाच आता एका युजरने तिला पूर्व पतीशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यावर उत्तर देताना तिने शालीनवर निशाणा साधला आहे.

'पूर्व पतीसोबत पॅचअप करून घे' म्हणणाऱ्याला दलजीत कौरचं उत्तर; शालीनवर साधला निशाणा
निखिल पटले, दलजीत कौर, शालीन भनोतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 11:15 AM

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. दलजीतने 2023 मध्ये केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं होतं. लग्नानंतर ती मुलाला घेऊन पतीसोबत केन्याला राहायला गेली होती. मात्र लग्नाच्या आठ महिन्यांतच ती मुलाला घेऊन केन्यातून भारतात परतली. त्यानंतर सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहित तिने पतीवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले. तर दुसरीकडे निखिलनेही दलजीतसोबतच्या लग्नाला मान्यता देण्यास नकार दिला. निखिलला घटस्फोट देण्याची चर्चा असतानाच आता दलजीतने पूर्व पती आणि टीव्ही अभिनेता शालीन भनोतवर निशाणा साधला आहे.

दलजीतच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत एका सोशल मीडिया युजरने तिला कठीण काळात पूर्व पती शालीन भनोतची मदत घेण्याचा सल्ला दिला. त्यावर दलजीतने उत्तर दिलं आहे. ‘त्याने एकदाही मेसेज किंवा कॉल केला नाही. मला वाटत नाही की त्याच्या मुलासोबत काय घडलंय, हे जाणून घेण्यात त्याला काही रस असेल. तो कदाचित खूप जास्तच व्यस्त असेल’, अशी उपरोधिक पोस्ट दलजीतने लिहिली आहे. दलजीने शालीन भनोतशी पहिलं लग्न केलं होतं. ‘कुलवधू’ या मालिकेच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. याच मालिकेत एकत्र काम करताना दोघं प्रेमात पडले आणि 2009 मध्ये लग्न केलं. मात्र लग्नाच्या सहा वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेतला. त्यावेळी दलजीतने शालीनवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. या दोघांना जेडन हा मुलगा आहे.

हे सुद्धा वाचा

दलजीतने 2023 मध्ये निखिलशी दुसरं लग्न केलं. निखिल हा केन्यातील बिझनेसमन असून लग्नानंतर दलजीत त्याच्यासोबत केन्यामध्येच राहत होती. मुलगा जेडनलाही ती सोबत घेऊन गेली होती. मात्र लग्नाच्या दहा महिन्यांतच ती मुलाला घेऊन भारतात परतली आहे. सुरुवातीला तिने यावर मौन बाळगलं होतं. मात्र नंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने निखिलवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला. काही दिवसांपूर्वी तिने निखिलवर फसवणुकीचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. नुकताच निखिल त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबत मुंबईत आला होता. यावेळी पापाराझींसमोर दोघांनी फोटोसाठी पोझसुद्धा दिले होते. यावरून दलजीतनेही सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं होतं.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.