जन्म होताच वडिलांनी आईला सोडलं, कमी वयात कुटुंबाची जबाबदारी, गौतमी पाटीलचा हृदयस्पर्शी संघर्ष

गौतमी पाटीलने आपण डान्सर कसे झालो, आपला इथपर्यंतचा प्रवास कसा होता याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी ती भावूक झाली.

जन्म होताच वडिलांनी आईला सोडलं, कमी वयात कुटुंबाची जबाबदारी, गौतमी पाटीलचा हृदयस्पर्शी संघर्ष
गौतमी पाटील
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 9:24 PM

पुणे : इन्स्टारील स्टार आणि आपल्या डान्सने सध्या चर्चेत असलेली डान्सर गौतमी पाटीलने आज पत्रकार परिषद घेतली. गौतमी पाटील हिचा मंगळवारी (1 नोव्हेंबर) सांगलीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तरुणांनी तुफान गर्दी केली होती. तिच्या या कार्यक्रमात गर्दीत एक मृतदेह सापडल्याची बातमी समोर आली. संबंधित घटनेशी आपला काहीच संबंध नाही, असं गौतमीने पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी आपण डान्सर कसे झालो, आपला इथपर्यंतचा प्रवास किती कठीण होता ते प्रसारमाध्यमांना सांगितलं.

गौतमी पाटील ही मुळची कोल्हापूरची असल्याची सोशल मीडियावर चर्चा होती. पण ती कोल्हापूरची नसून खान्देशाची आहे, असं तिने आज स्वत: स्पष्ट केलंय. “मी खान्देशची. शिंदेखेडा हे माझं गाव. माझ्या वडिलांचं चोपडा हे गाव. आईचं गाव शिंदखेडा होतं”, असं गौतमीने स्पष्ट केलं.

“माझ्याकडे वडील नाहीयत. माझा जन्म झाला तसं माझ्या वडिलांनी आईला सोडलं. त्यांनी आईला नवव्या महिन्यातच सोडलं होतं. आई तिच्या आई-वडिलांकडे राहायची. माझ्या आजी-आजोबांनीच मला सांभाळलं. मी त्यांच्याचकडे राहिली”, अशी माहिती गौतमीने दिली.

हे सुद्धा वाचा

“मी आजपर्यंत माझ्या वडिलांना पाहिलं नव्हतं. मी आठवीला माझ्या वडिलांना पाहिलं आहे. त्यांनाही पुण्यात आणण्याचा प्रयत्न केला पण ते पुण्यात व्यवस्थित राहीले नाहीत. ते ड्रिंक वगैरे करत होते म्हणून आम्ही त्यांना सोडलं”, असं गौतमी म्हणाली.

“माझ्या मामांनी विचार केलेला की, यांचं चांगलं व्हावं म्हणून त्यांनी वडिलांनादेखील पुण्यात आणलं होतं. माझ्या आई-वडिलांचा, आमचा संसार बसावा म्हणून मी पुण्यात आले. पण ते दारु प्यायचे. ते व्यवस्थित राहीले नाहीत. ते पुन्हा परत गावी गेले”, असं गौतमी म्हणाली.

“आईने जॉब केला. आईने बिसलेरी आणि इतर कंपनीत काम केलं. नंतर आईचा पीएमटीत अपघात झाला. आई गर्दीत पडली. तिला टाके पडले होते. त्यावेळी मी शिक्षण घेत होती. डान्स क्लासला देखील शिक्षण घेत होती. पण आईचा अपघात झाल्याने तिचं काम सुटलं. त्यामुळे शाळेत जाणं जमलं नाही. आई काम करण्याच्या परिस्थिती नव्हती त्यामुळे मी या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि काम करायला सुरुवात केली”, अशी माहिती गौतमीने दिली.

“मी ओळखीने ऑर्केस्ट्रामध्ये काम करायला लागली. महेंद्र बनसुळे सर यांच्याकडे मला नेण्यात आलं. अकलूज लावणी महोत्सव हा माझा पहिला महोत्सव. तिथे मी बॅक डान्सर होती. तेव्हा मला 500 रुपये मानधन मिळाले होते. तिथून माझी सुरुवात झाली. त्यानंतर संपर्क वाढत गेला. सानिया ताई भेटल्या. मग पुढे चालत गेली. माझी अशी डान्सला सुरुवात झाली”, असं गौतमीने सांगितलं.

“मी कोल्हापूरची नाही. तर धुळ्याची आहे. शिंदखेडा येथील गावात माझा जन्म झालाय. मी तिथेच मोठी झाली. मी तिथून आठवीत असताना पुण्यात आले. शिक्षण कमी झालंय. त्यानंतर मी नृत्य क्षेत्रात आली. घरची परिस्थितीमुळे मी या क्षेत्रात आली. आधी मी बॅक डान्सर होती. हळूहळू पुढे आली”, अशा शब्दांत गौतमीने आपला प्रवास उलगडून सांगितला.

' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.