‘घाण व्हिडीओ बनवून कुणीही व्हायरल होतं’, राधा पाटील हिचा गौतमी पाटीलवर निशाणा

डान्सर राधा पाटील हिने गौतमी पाटील हिच्यावर निशाणा साधला. 'घाण व्हिडीओ बनवून कुणीही व्हायरल होतं', असं राधा पाटील म्हणाली. राधाच्या वक्तव्यावर गौतमी पाटील हिनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

'घाण व्हिडीओ बनवून कुणीही व्हायरल होतं', राधा पाटील हिचा गौतमी पाटीलवर निशाणा
राधा पाटील हिचा गौतमी पाटीलवर निशाणा
Follow us
| Updated on: Aug 27, 2024 | 5:36 PM

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह आहे. मुंबईत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दहीहंडीचा मोठा जल्लोष बघायला मिळतोय. दहीहंडीचा कार्यक्रम म्हटला की, मोठमोठे सेलिब्रेटींचा परफॉर्मन्स हा आलाच. टीव्ही, सोशल मीडियावर दिसणारे स्टार्सचा लाईव्ह परफॉर्मन्स दहीहंडीच्या निमित्ताने तरुणांना बघायला मिळतो. आमदार प्रकाश सूर्वे यांच्या मागाठाणे येथील दहीहंडी उत्सवात अनेक सेलिब्रेटी येतात. त्यांच्याकडून गोविंदा पथकांना प्रोत्साहित केलं जातं. प्रकाश सूर्वे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या उत्सवात डान्सर गौतमी पाटील ही आकर्षणाची केंद्रबिंदू राहिली. गौतमी पाटीलची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. तिच्या नृत्याच्या प्रत्येक अदावर चाहत्याचं मन घायाळ होतं. त्यामुळे गौतमीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण डान्सर राधा पाटील हिने गौतमी पाटील हिच्यावर निशाणा साधला आहे. ‘घाण व्हिडीओ बनवून कुणीही व्हायरल होतं. मी साडी नेसून व्हायरल झाली’, असं राधा पाटील म्हणाली आहे.

राधा पाटील हिने आज मागाठाणे आणि बोरीवलीत परफॉर्मन्स केला. या दरम्यान तिने ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरते. मला असं वाटतं की, मला मुंबईकरांनी खूप सपोर्ट केला पाहिजे. मला आज त्यांचा खूप सपोर्ट दिसतो आहे. आपण नक्कीच मुंबईचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात करु. घाण व्हिडीओ बनवून रिल्सवर कुणीही व्हायरल होतं. आम्ही तरी साडी नेसून व्हायरल होतो. मला तुमच्या सर्वांचा पाठिंबा हवा आहे”, असं राधा पाटील म्हणाली.

राधाचा गौतमीवर निशाणा

“गौतमी पाटील हिच्यासोबत माझी स्पर्धा नाही. घाण व्हिडीओ काढून कुणीही व्हायरल होऊ शकतं. आम्ही साडी नेसून व्हायरल झालो आहोत. हे लोकांनादेखील दिसत आहे की, मी आजपर्यंत कशी व्हायरल झाले ते. आता बघू किती प्रेम मिळतं”, अशा शब्दांत राधा पाटील हिने गौतमीवर निशाणा साधला.

“मला कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल आयोजकांची खूप आभारी आहे. आता मी महाराष्ट्रात नंबर वनवर नक्की येणार”, अशी आशा राधा पाटील हिने व्यक्त केली. “दहीहंडीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. सपोर्ट करणार असाल तर तुम्ही मला नक्की सपोर्ट करा. मी पाटील नाव जास्त लावत नाही तर राधा मुंबईकर असं लावते. तर मुंबईकरांचा मला आज खूप सपोर्ट मिळाला आहे. मला आज खूप छान वाटलं आहे”, असं राधा पाटील म्हणाली. तसेच “मला टीव्ही 9 मराठीचादेखील पाठिंबा हवा आहे”, असंही राधा पाटील म्हणाली.

गौतमी पाटील काय म्हणाली?

दरम्यान, राधा पाटील हिच्या टीकेनंतर गौतमीची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण गौतमीने त्यावर बोलण्यास नकार दिला. “मला त्याबाबतीत काही माहिती नाही. प्रेक्षकांचं प्रेम आहे तर मी आहे. प्रेक्षक आज मला प्रेम देतात म्हणून मी आज इथपर्यंत आहे. मी काही बोलणार नाही”, असं गौतमी पाटील म्हणाली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.