VIDEO : ‘रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना’, मराठमोळ्या डान्सिंग क्वीनचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल
डान्सिग क्वीन फेम दीप्ती नायरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओत ती 'रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना' या गाण्यावर खूप सुंदर नृत्य करताना दिसत आहे (Dancing queen fame Deepti Nair dance video)
मुंबई : महाराष्ट्रातील वजनदार डान्स रिअॅलिटी शो ‘डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच दोन महिन्यांपूर्वी संपन्न झाला. थोडं जास्त थोडं एक्स्ट्रा सगळ्यांनाच आवडतं, त्यासाठी झी मराठीनं ‘डान्सिंग क्विन साईज लार्ज, फुल चार्ज’ असा एक कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम जगातील पहिला वजनदार डान्सिंग शो ठरला. यामध्ये 15 वर्ष आणि त्यावरील 70 किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. या वजनदार स्पर्धकांचं परिक्षण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि RJ मलिष्का यांनी केलं होतं. या कार्यक्रमातील स्पर्धक दीप्ती नायर महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचली होती. या मंचावर दीप्तीने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली (Dancing queen fame Deepti Nair dance video).
दीप्ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती आपल्या नृत्याचे वेगवेगळे व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. तिच्या या व्हिडीओजला नेटीझन्सकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. तिने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. ‘रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना’ या गाण्यावर दीप्ती थिरकताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडीओला बघितल्यावर आपल्या महाराष्ट्रात इतके दिग्गज कलाकार आहेत, या विचाराने तुम्हाला अभिमान वाटेल (Dancing queen fame Deepti Nair dance video).
View this post on Instagram
दीप्तीसोबत नृत्य करणारा तो तरुण कोण?
व्हिडीओत दीप्तीसोबत एक तरुणदेखील थिरकताना दिसत आहे. हा तरुण नेमका आहे तरी कोण? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर या तरुणाचं नाव चैतन्य बागूल असं असल्याचं समोर आलं. चैतन्य हा देखील एक डान्सरच आहे. चैतन्यचं यूट्यूबवर चॅनल आहे. त्याचबरोबर तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही त्याच्या डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतो.
View this post on Instagram
आम्ही चैतन्यला दीप्तीसोबत डान्स करतानाचा त्याचा अनुभव कसा होता? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने खूप आनंदाने आपले अनुभव शेअर केले. चैतन्य ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता त्या महाविद्यालयात दीप्ती प्रोफेसर होती, अशी माहिती त्याने दिली. तेव्हापासून आपली दीप्तीसोबत ओळख असल्याचं त्याने सांगितलं. त्याचबरोबर दीप्तीसोबत आपण आणखी काही व्हिडीओ बनवणार असल्याचं चैतन्यने सांगितलं.
View this post on Instagram
View this post on Instagram
हेही वाचा : Video : बोल्ड आणि टोल्ड नेहा पेंडसे, खास व्हिडीओ शेअर करत नवऱ्याला गिफ्ट!