शाही कुटुंबाची लेक, लहानपणीच बापाने आईची सोडली साथ, ‘ती’ आज कोट्यवधींची मालकीण

Daughter of the royal family: शाही कुटुंबाच्या लेकीचं बापाशिवाय गेलं बालपण... आईची साथ सोडून बापाने थाटला दुसरा संसार, आज 'ती' मुलगी वयाच्या 28 व्या वर्षी कमवतो कोट्यवधींची माया..., सध्या सर्वत्र तिचीच चर्चा...

शाही कुटुंबाची लेक, लहानपणीच बापाने आईची सोडली साथ, 'ती' आज कोट्यवधींची मालकीण
Follow us
| Updated on: Aug 12, 2024 | 1:00 PM

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी मुलांच्या जन्मानंतर पहिल्या पत्नीची साथ सोडत दुसरा संसार थाटला. ज्यामुळे अभिनेत्यांच्या पहिल्या कुटुंबाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. अशाच एक अभिनेत्यापैकी एक अभिनेता म्हणजे सैफ अली खान… सैफ अली खान याने दोन मुलांच्या जन्मानंतर पहिली पत्नी अमृता सिंग हिला घटस्फोट दिला आणि अभिनेत्री करिना कपूर हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. एकट्या अमृता हिने लेक सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान यांचा सांभाळ केला. आता सारा 28 वर्षांची झाली आहे आणि अभिनेत्रीने स्वतःच्या बळावर कोट्यवधींची संपत्ती कमवली आहे. आज सारा अली खान हिचं नेटवर्थ, संपत्ती, घर आणि कार कलेक्शनबद्दल जाणून घेऊ…

सारा अली खान हिच्या पहिल्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केदारनाथ’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सिनेमात सारा हिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत सक्रिन शेअर केली. सिनेमातील दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली. ‘केदारनाथ’ सिनेमातून यश मिळाल्यानंतर साराने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

‘केदारनाथ’ सिनेमानंतर साराने अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. साराने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. आज सारा आई आणि भावासोबत रॉयल आयुष्य जगते. वयाच्या 28 व्या वर्षी सारा हिने 41 कोटी रुपयांचा संपत्ती कमवली आहे. सांगायचं झालं तर, सारा एका सिनेमासाठी रिपोर्टनुसार, जवळपास 5 ते 7 कोटी रुपयांचं मानधन घेते. शिवाय अभिनेत्री जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील बक्कळ कमाई करते.

मुंबईत साराने स्वतःचं आलिशान घर देखील घेतलं आहे. सारा हिच्या घराची किंमत रिपोर्टनुसार 1.5 कोटी रुपये आहे. सारा हिच्या गॅरजमध्ये अनेक महागड्या गाड्या देखील आहे. सारा हिच्याकडे Mercedes-Benz G-Class 350d यांसारख्या अनेक महागड्या गाड्या आहे. ज्यांची किंमत कोट्यवधी आहे.

सारा हिने फार कमी कालावधीत बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. सारा हिने स्वतःच्या स्वभावाने देखील चाहत्यांची मने जिंकली आहेत. चाहत्यांसोबत गप्पा मारताना आणि फोटो क्लिक करताना साराला कायम स्पॉट केलं जातं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.