नीतू कपूर यांनी कतरिनाला टोमणा मारल्यानंतर आलियाने सर्वांसमोर रणबीरवर केला प्रेमाचा वर्षाव; नेटकरी म्हणाले ‘फेक’

नीतू कपूर यांची पोस्ट नुकतीच चर्चेत आली होती. ‘त्याने तुम्हाला 7 वर्षे डेट केलं म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तो तुमच्याशी लग्न करेल. माझे काका 6 वर्षे मेडिसीन शिकले, पण आता ते डीजे आहेत’, असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

नीतू कपूर यांनी कतरिनाला टोमणा मारल्यानंतर आलियाने सर्वांसमोर रणबीरवर केला प्रेमाचा वर्षाव; नेटकरी म्हणाले 'फेक'
Alia Bhatt and Ranbir Kapoor Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 11:20 AM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांच्या एका पोस्टची गेल्या काही दिवसांत चर्चा होती. या पोस्टद्वारे त्यांनी रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफला टोमणा मारल्याचं बोललं जातं होतं. या चर्चांदरम्यान नुकताच आलिया भट्ट आणि रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. हे दोघं मुंबईतील त्यांच्या नवीन घराचं बांधकाम पहायला गेले होते. त्यावेळी पापाराझींनी आलिया आणि रणबीरचा व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमुळे हे दोघं सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

या व्हिडीओत रणबीर आणि आलिया त्यांच्या गाडीमध्ये बसलेले दिसत आहेत. गाडीत बसूनच रणबीर चाहत्यांना हस्तांदोलन करतो. यावेळी त्याच्या बाजूला बसलेली आलिया रणबीरच्या गालावर किस करते आणि त्याला मिठी मारते. एकीकडे चाहते या दोघांची केमिस्ट्री पाहून खुश झाले आहेत. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी आलियाला ‘फेक’ (खोटी) असं म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

‘रणबीर आता तुझाच आहे, दीपिका किंवा कतरिनाचा नाही. तू का ओव्हरॲक्टिंग करतेय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘आम्ही दोघं एकमेकांच्या खूप प्रेमात आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न आलिया करतेय, पण सत्य काहीतरी वेगळंच आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

पहा व्हिडीओ

नीतू कपूर यांचा कतरिनाला टोमणा?

नीतू कपूर यांची पोस्ट नुकतीच चर्चेत आली होती. ‘त्याने तुम्हाला 7 वर्षे डेट केलं म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तो तुमच्याशी लग्न करेल. माझे काका 6 वर्षे मेडिसीन शिकले, पण आता ते डीजे आहेत’, असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं. नीतू कपूर यांची ही स्टोरी पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचा संबंध रणबीर कपूरच्या भूतकाळातील रिलेशनशिप्सशी लावला. त्यावरून काहींनी नीतू यांच्यावर टीकासुद्धा केली.

रणबीर आणि कतरिनाचं रिलेशनशिप इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत होतं. जवळपास सहा ते सात वर्षे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी कपूर कुटुंबातील ख्रिसमस पार्टीलाही कतरिनाने हजेरी लावली होती. मात्र ज्यावेळी या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली, तेव्हाच त्यांचे मार्ग वेगळे झाले. रणबीरने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात आलिया भट्टशी लग्न केलं. या दोघांना राहा ही मुलगी आहे. तर कतरिनाने अभिनेता विकी कौशलशी लग्नगाठ बांधली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.