Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कीर्ती शिलेदार याच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचं मोठं नुकसान, अजित पवारांकडून श्रद्धांजली

'कीर्तीताई यांचं निधनाने मराठी रंगभूमी आणि महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीही भरून निघणारी नाही', असं अजित पवार म्हणाले आहेत

कीर्ती शिलेदार याच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचं मोठं नुकसान, अजित पवारांकडून श्रद्धांजली
कीर्ती शिलेदार, अजित पवार
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 11:51 AM

मुंबई: ज्येष्ठ गायिका (singer) आणि संगीत नाटक कलाकार ( musical artist) कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांचे आज निधन झालं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘कीर्तीताई यांचं निधनाने मराठी रंगभूमी आणि महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीही भरून निघणारी नाही’, असं अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांपकडून कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली

‘ज्येष्ठ अभिनेत्री, शास्त्रीय गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीला समर्पित महान कलावंत काऋळाच्या पडद्याआड गेला. वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलेल्या कीर्तीताईंनी आपल्या सुरेल गायन आणि सदाबहार अभिनयानं मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. देशविदेशात स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला. आई जयमाला आणि वडील जयराम शिलेदार यांचा कलेचा वारसा पुढं नेताना मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात योगदान दिलं. त्यांचं निधन ही मराठी रंगभूमी, महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. मी कीर्तीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो’, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कीर्ती शिलेदार मागच्या काही दिवसांपासून आजारी होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांना शनिवारी उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तिथे उपचार केले जात होते. मात्र हळूहळू त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणं बंद केल. आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर डायलेसीसचे उपचार सुरु होते.

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते जयराम शिलेदार व अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या त्या कन्या होत. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं . त्यांनी संगीत कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी, संशय कल्लोळ, स्वयंवर, संगीत सौभद्र, मृच्छ कटिक, मंदोदरी, एकच प्याला या सारख्या नाटकांना कीर्ती शिलेदार यांचा सूर मिळाला.अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषविलं.

नाटकांचे 4000 हून अधिक प्रयोग

कीर्ती शिलेदार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी साहित्य शाखेच्या पदवी घेतली होती. त्यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर 4000 हून अधिक प्रयोग झाले आहेत. देशातल्या मराठी रसिकांसाठी त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली.

संबंधित बातम्या

Kirti Shiledar| ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाटक कलाकार कीर्ती शिलेदार यांचे निधन ; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अमोल कोल्हेंच्या समर्थनार्थ नाना पाटेकर मैदानात, म्हणाले, भूमिका केली म्हणजे…

Jay Bhim | सूर्याच्या ‘जय भीम’ चित्रपटाचा जगभरात डंका, आता थेट ऑस्करच्या शर्यतीत !

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.