Avatar: The Way of Water | अवतार 2 चित्रपट बघायला गेलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू
अवतार 2 ला जगभरामध्ये प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाचा ओपनिंग डे दणदणीत झाला.
मुंबई : हॉलिवूडचा अवतार 2 हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाला भारतामध्येही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. धडाकेबाज ओपनिंग या चित्रपटाने केलीये. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून अवतार 2 ची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी 16 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज झालाय. मात्र, आंध्र प्रदेशमध्ये अवतार 2 बघायला गेलेल्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीये. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
अवतार 2 ला जगभरामध्ये प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाचा ओपनिंग डे दणदणीत झाला. आंध्र प्रदेशमधील पेद्दापुरम शहरामध्ये लक्ष्मीरेड्डी श्रीनू हे अवतार 2 चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये गेले होते.
चित्रपट सुरू असतानाच लक्ष्मीरेड्डी श्रीनू यांचा जीव गेला. लक्ष्मीरेड्डी श्रीनू यांच्या मृत्यूचे कारण पुढे आले असून हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा जागीच जीव गेला.
श्रीनू आणि त्यांचा भाऊ चित्रपट बघायला गेले होते. मात्र, चित्रपट सुरू असतानाच लक्ष्मीरेड्डी श्रीनू हे खाली पडले. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातंय. या अगोदर 2009 मध्ये अवतार चित्रपटाचा पहिला भाग हा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेंव्हापासूनच प्रेक्षक याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहात होते.