दीड वर्षाच्या मुलीला एका झटक्यात उलटं फिरवलं; डेबिना-गुरमीतवर भडकले नेटकरी

अभिनेत्री डेबिना बॅनर्जीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलीसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये डेबिना आणि गुरमीत हे त्यांची मुलगी लियानासोबत बेडवर मस्ती करत आहेत. अशातच दोघं त्यांच्या हाताने मुलीला एका झटक्यात उलटं फिरवतात.

दीड वर्षाच्या मुलीला एका झटक्यात उलटं फिरवलं; डेबिना-गुरमीतवर भडकले नेटकरी
Debina Bonnerjee and Gurmeet ChoudharyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 12:17 PM

मुंबई : 9 फेब्रुवारी 2024 | सोशल मीडियावर सेलिब्रिटी त्यांच्या रोजच्या आयुष्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. ‘रामायण’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध जोडी म्हणजेच अभिनेत्री डेबिना बॅनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी हे दोघं सोशल मीडियावर सक्रिय असतात. डेबिनाने नुकताच सोशल मीडियावर तिच्या मुलीसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवरून डेबिना आणि गुरमीतला जोरदार ट्रोल केलं जातंय. अवघ्या दीड वर्षांच्या मुलीला एका झटक्यात गोल फिरवल्याने या दोघांवर टीका केली जातेय. असं केल्याने तिच्या मानेला झटका बसू शकतो, असं नेटकरी म्हणत आहेत.

या व्हिडीओमध्ये डेबिना आणि गुरमीत हे बेडवर मुलीसोबत खेळत असतात. दोघं एकमेकांचा हात पकडून मधे मुलीला उभं करतात. त्यांच्या या मुलीचं नाव लियाना असं आहे. लियानाला मधे उभं केल्यानंतर डेबिना आणि गुरमीत त्यांच्या हाताने तिला पूर्ण गोल फिरवतात. असं केल्यानंतर लियाना हसू लागते आणि तिच्यासोबत डेबिना-गुरमीतसुद्धा हसू लागतात. मात्र ही मस्करी नेटकऱ्यांना आवडली नाही. त्यांनी दोघांनाही यावरून सुनावलं आहे. लहान मुलांचं शरीर जरी लवचित असलं तरी अशाने तिच्या मानेला झटका बसू शकतो, असं एकाने म्हटलंय. तर ‘असं करू नका. तिच्या मानेला वेदना होतील’, असं दुसऱ्याने लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

डेबिना आणि गुरमीत हे काही काळापूर्वीच दोन गोंडस मुलींचे आई-बाबा झाले. हे दोघं सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. विविध पोस्ट आणि व्लॉगद्वारे ते सतत चाहत्यांच्या संपर्कात असतात. मात्र डेबिना अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोलिंगची शिकार होते. याआधीही ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. 14 महिन्यांच्या मुलीला शाळेत पाठवण्यास सुरुवात केल्याने तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. डेबिनाने 2011 मध्ये अभिनेता गुरमीत चौधरीशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर डेबिनाला गरोदरपणात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. अखेर एप्रिल 2022 मध्ये तिने IVF द्वारे (इन विट्रो फर्टिलायजेशन) मुलीला जन्म दिला. त्यानंतर दुसऱ्यांदा ती नैसर्गिक पद्धतीने गरोदर झाली.

डेबिना आणि गुरमीतच्या पहिल्या मुलीचं नाव लियाना तर दुसऱ्या मुलीचं नाव दिविशा असं आहे. डेबिनाची दुसरी गर्भधारणा ही नैसर्गिक पद्धतीने झाली असली तरी दिविशाचा जन्म डिलिव्हरीच्या तारखेआधी झाला होता. त्यामुळे तिला रुग्णालयात काही दिवस दाखल करण्यात आलं होतं.

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.