लोकं छोटा हत्ती म्हणायचे… टीव्हीवरच्या सीतेला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो तेव्हा !
टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जीने टीकाकारांना सडेतोड उत्तर देऊन त्यांचं तोंड बदं केलं आहे. डिलीव्हरीनंतर तिचं वजन खूप वाढल्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
‘रामायण’ या टीव्ही मालिकेत सीतेची भूमिका निभावणाऱ्या देबिना बॅनर्जीचे (Debina Bonnerjee) नाव या शोमुळे घराघरांत पोहोचले होते. तिच्या भूमिका तसेच तिचे लूक्स यामुळे देबिना बरीच चर्चेत असते. मात्र डिलीव्हरीनंतर तिलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. एका मुलाखतीत देबिनाने याबद्दलचा तिचा अनुभव सांगितला होता. बरेच लोक तिच्यावर कमेंटस करायचे आणि काही तर तिला ‘ छोटा हत्तीही ‘ म्हणायचे अस देबिनाने नमूद केलं. दोन मुलींच्या जन्मानंतर देबिनाचं वजन खूप वाढलं होतं. मात्र आता तिने ट्रोलर्सना (trollers) सडेतोड उत्तर देत त्यांचं तोंड बंद केलं आहे.
देबिना बॅनर्जी कधीच तिचा व्यायाम, वर्कआऊट मिस करत नाही. तिने तिच्या व्लॉगमध्ये हे नमूद केलं आहे. यामध्ये ती तिच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दलही बरंच बोलली आहे. आधी सगळे मला छोटा हत्ती, हत्तीच पिल्लू असं म्हणायचे. मला कळतं नाही लोकं असं का बोलतात ? हे ऐकल्यावर मी मनात विचार करायचे ती मेहनत करणं कधीच थांबवू नये. जेव्हा लोकं टोमणा मारत असतील तेव्हा ते सकारात्मकरित्या घ्यायचं आणि आपल्या (योग्य) दिशेने पावलं टाकत रहायची.,, असं देबिनाने सांगितलं.
ट्रोलिंगमुळे स्वत:ला करते मोटिव्हेट
वेट लॉस जर्नीबद्दल बोलताना देबिना म्हणाली पाऊस असो किंवा ऊन, मी कधीच वर्कआऊट थांबवत नाही. मी तो निर्णय घेतला आहे. चरबी कमी करणे हे अतिशय मेहनतीचं काम आहे. ट्रोलिंग करणारे टोमणे मारतात, शिव्या देतात. पण त्या कमेंट्सवरून मी प्रेरणा घेते आणि वर्कआऊट सुरूच ठेवते.
घरापासून 20 किमी दूर जाऊन करते व्यायाम
मी माझ्या घरापासून 20 किमी दूर जाऊन व्यायाम करते असं देबिनाने सांगितलं. मी आणि गुरमीत (तिचा पती) दोघेही पहाटे ४ वाजता उठतो. व्यायाम करण्यासाठी २० किमी लांब ड्राईव्ह करून जातो आणि मग वर्कआईऊट करतो. यासाठी खूप मेहनत करावी लागते. पण मेहनत केलीच नाही तर यश कसं मिळेल, असा सवाल देबिना विचारते.