Debina Bonnerjee | लग्नाच्या 11 वर्षांनंतर IVF द्वारे आई झाली डेबिना; सांगितला प्रक्रियेचा खर्च

पहिल्या मुलीच्या प्रसूतीनंतर चार महिन्यांनी डेबिनाने दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. 11 नोव्हेंबर 2022 रोजी डेबिनाने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. डेबिना आणि गुरमीतच्या पहिल्या मुलीचं नाव लियाना तर दुसऱ्या मुलीचं नाव दिविशा असं आहे.

Debina Bonnerjee | लग्नाच्या 11 वर्षांनंतर IVF द्वारे आई झाली डेबिना; सांगितला प्रक्रियेचा खर्च
Debina BonnerjeeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 3:25 PM

मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री डेबिना बॅनर्जीने काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या मुलीला जन्म दिला. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच गरोदर झाल्याने तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डेबिना तिच्या प्रेग्नंसीविषयी, त्यातील अडचणींविषयी आणि आयव्हीएफविषयी (IVF) मोकळेपणे व्यक्त झाली. डेबिनाने 2011 मध्ये अभिनेता गुरमीत चौधरीशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर डेबिनाला गरोदरपणात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. अखेर एप्रिल 2022 मध्ये तिने IVF द्वारे (इन विट्रो फर्टिलायजेशन) मुलीला जन्म दिला. त्यानंतर दुसऱ्यांदा ती नैसर्गिक पद्धतीने गरोदर झाली.

IVF बद्दल काय म्हणाली?

डॉक्टरांनी डेबिनाला आधी IUI (इन्ट्रॉटराइन इन्सेमिनेशन) प्रक्रियेद्वारे गरोदर होण्याचा सल्ला दिला होता. ही फार क्लिष्ट प्रक्रिया नाही. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “यात महिन्याच्या ठराविक दिवसांमध्ये डॉक्टर काही इंजेक्शन्स देतात. पतीच्या वीर्याचाही अभ्यास केला जातो. पण ही प्रक्रिया माझ्या कामी आली नव्हती. मी पाच वेळा IUI ट्रिटमेंट घेतली आणि पाचही वेळा त्यात मला अपयश आलं.”

“IUI ट्रिटमेंटनंतर सर्वोत्तम पर्याय हा IVF चा होता. त्यात भ्रूण (Embryo) ट्रान्सफरची किंमत 30 हजार रुपये होती. ही किंमत प्रत्येक हॉस्पिटलनुसार वेगळी असू शकते. IVF द्वारे माझी गर्भधारणा झाली. सुरुवातीला मी घाबरले होते पण आता मला काहीच भीती वाटत नाही. जेव्हा लोक विचारतात की IVF ट्रान्सफरचा पर्याय का अवंलबला, तेव्हा मी सांगते की जर एखादी गोष्ट बराच काळ प्रयत्न करूनसुद्धा होत नसेल तर मी माझा आणखी वेळ वाया घालवू शकत नव्हती. गर्भधारणा का होत नाही याचा विचार करत मी बसू शकले नसते. त्यापेक्षा मी प्रयत्न करण्याला प्राधान्य दिलं आणि पाच वर्षांनंतर मला मुलगी झाली”, असं तिने पुढे सांगितलं.

हे सुद्धा वाचा

पहिल्या मुलीच्या प्रसूतीनंतर चार महिन्यांनी डेबिनाने दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. 11 नोव्हेंबर 2022 रोजी डेबिनाने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. डेबिना आणि गुरमीतच्या पहिल्या मुलीचं नाव लियाना तर दुसऱ्या मुलीचं नाव दिविशा असं आहे. डेबिनाची दुसरी गर्भधारणा ही नैसर्गिक पद्धतीने झाली असली तरी दिविशाचा जन्म डिलिव्हरीच्या तारखेआधी झाला होता. त्यामुळे तिला रुग्णालयात काही दिवस दाखल करण्यात आलं होतं.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.