‘दीपिका तुझ्यासाठी माझी सगळी संपत्ती द्यायला तयार’, दीपिका पादुकोणवरच्या प्रेमाची कपिल शर्माकडून कबुली

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'गेहराईयाँ'ची टीम 'द कपिल शर्मा' शोमध्ये येणार आहेत. यावेळी कपिल शर्माने दीपिकावरचं प्रेम बोलून दाखवलं आहे.

'दीपिका तुझ्यासाठी माझी सगळी संपत्ती द्यायला तयार', दीपिका पादुकोणवरच्या प्रेमाची कपिल शर्माकडून कबुली
दीपिका पादुकोण, कपिल शर्मा
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 2:01 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukon) सध्या ‘गेहराईयाँ’ (Geharaiya) हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रमांमध्ये ‘गेहराईयाँ’ची टीम प्रमोशनसाठी जाताना दिसतेय. दीपिका आणि ‘गेहराईयाँ’ची टीम ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये (The Kapil Sharma Show) येणार आहे. याचा प्रोमो सध्या आऊट झाला आहे. यात कपिल शर्मा (Kapil Sharma) दीपिकासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. ‘दीपिकासाठी सगळी संपत्ती मी द्यायला तयार आहे’, असं कपिल म्हणला आणि त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कपिल दीपिकाला काय म्हणाला?

दीपिका पादुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी हे कलाकार ‘गेहराईयाँ’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये येणार आहे. याचा प्रोमो सध्या आऊट झाला आहे. यात कपिल शर्मा दीपिकासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. कपिलने दीपिकाला विचारले की, ‘तुला जर कॉमेडी शो करायचा असेल तर तू हिरो म्हणून कुणाची निवड करशील?’ त्यावर दीपिका म्हणाली, ‘मला हिरो आणि दिग्दर्शक म्हणून तू काम केलेलं आवडेल तसंच तुझी इच्छा असेल तर त्या चित्रपटाला प्रोड्युसही तूच कर.’ यावर, ‘दीपिका तुझ्यासाठी सगळी संपत्ती मी द्यायला तयार आहे’, असं कपिल म्हणला आणि एकच हश्या पिकला. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

‘गेहराईयाँ’ची चित्रपटाची गोष्ट

गेहराईयाँ (gehraiyaan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. यात दीपिका पदुकोन, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर रजत कपूर, नसिरुद्दीन शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. दोघी बहिणी आणि त्यांचं एकमेकींच्या भोवती फिरणारं ‘लव्ह लाईफ’ अशी या सिनेमाची थोडक्यात गोष्ट सांगता येईल.

सिनेमा कधी प्रदर्शित होणार

गेहराईयाँ हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. Amazon primeवर हा सिनेमा पाहता येईल. दीपिकाचा ओटीटीवरचा हा पहिला सिनेमा असल्याने या सिनेमा विषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

पावर ऑफ गर्ल ! अमृता अरोराच्या बर्थडे पार्टीत करीना कपूर खानची गर्ल गॅंग एकत्र,मलायकाचा लूक पाहिलात का ?

Alia Bhatt and Ranbir Kapoor : आलिया भट आणि रणबीर कपूर एकत्र स्पॉट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Death Anniversary : बर्लिन ऑलिम्पिकसाठी निवड, नंतर सिनेमातील खलनायक म्हणून गाजले, जाणून घ्या के. एन. सिंग यांची चित्रपट कारकीर्द

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.