कधी येणार दीपिका पादुकोण – रणवीर सिंग यांचं पहिलं बाळ? दोघांनी चाहत्यांना दिली आनंदाची बातमी..

Deepika Padukone | दीपिका पादुकोण - रणवीर सिंग यांनी चाहत्यांना दिली आनंदाची बातमी... इतर सेलिब्रिटींप्रमाणे दीपिका - रणवीर यांच्या आयुष्यात होणार नव्या पाहुण्याची एन्ट्री...

कधी येणार दीपिका पादुकोण - रणवीर सिंग यांचं पहिलं बाळ? दोघांनी चाहत्यांना दिली आनंदाची बातमी..
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 10:59 AM

मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून दीपिका हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली आहे. पण आता दोघांनी देखील रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दीपिका – रणवीर यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका आणि रणवीर यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

दीपिकाने हिने प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सोशल मीडियावर सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका – रणवीर यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. पोस्ट फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

दीपिका – रणवीर यांच्या पहिल्या बाळाचा जन्म सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहे. महिन्याच्या शेवटी अभिनेत्री बाळाला जन्म देईल. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून दीपिका हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली होती. पण आता इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत दोघांनी देखील आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

दीपिका – रणवीर यांची पहिली भेट दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्या ‘राम लिला’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. अखेर दोघांच्या पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका – रणवीर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं.

दीपिका पादुकोण हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री गेल्या वर्षी चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमात दीपिका मुख्य भूमिकेत होती. सिनेमा प्रदर्शित होताच, फक्त भारतात नाही तर, जगभरातील बॉक्स ऑफिसवर सिनेमाने तगडी कमाई केली. ‘पठाण’ सिनेमानंतर दीपिका ‘जवान’ सिनेमात देखील किंग खानसोबत दिसली.

अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, दीपिका ‘सिंघम अगेन’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात दीपिका हिच्यासोबत अभिनेता अजय देवगन, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.